उ.रा. गिरी
उ. रा. गिरी (१० ऑक्टोबर १९२९- ५ सप्टेंबर, १९८६ ) यांचे ‘मी एकटा निघालो’ (१९८३) ‘चंद्रायणी’ (१९८४) असे दोन संग्रह प्रसिद्घ आहेत.[ संदर्भ हवा ] पैकी ‘मी एकटा निघालो’ या संग्रहात प्रत्येक कवितेखाली तिचा लेखनकाल नोंदविलेला आहे.१९६४ ते १९८१ अशा कालखंडातील ह्या कविता आहेत. तर ‘चंद्रायणी’ मधील कविता १९५२ ते १९८१ या कालखंडातील असल्याचा उल्लेख स्वतः कवीने केला आहे.[ संदर्भ हवा ] ‘चंद्रायणी’ मध्ये सहा कविता गझल सादृश्य रचना आहेत. ‘मी एकटा निघालो’ या संग्रहातील एकूण २८ रचनात गझलचा आकृतिबंध सांभाळण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. पण त्यातील केवळ पंधरा रचनात तो यशस्वी झालेला दिसतो.[ संदर्भ हवा ] १९६५ मध्ये रचलेली ‘कर सैल तू गळ्यातील’ ही त्यांची गझल कालानुक्रमे पहिली गझल ठरते. त्यानंतरच्या काळात एक्कट दुक्कट गझला लिहिणाऱ्या गिरींनी १९७३ मध्ये चार आणि १९८० मध्ये चार गझला तंत्रशुद्घ लिहिलेल्या आहेत. १९८० मध्ये रचलेल्या दहा रचनांपैकी चारच रचना गझल म्हणून यशस्वी झालेल्या आढळतात.[ संदर्भ हवा ]