उमा भेंडे
उमा भेंडे - मूळ नाव अनसूया, (जन्म : १९४५; - सायन-मुंबई, १९ जुलै २०१७) या मराठी चित्रपटांतील एक अभिनेत्री होत्या. इ.स. १९६०मध्ये "आकाशगंगा" या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात प्रवेशलेल्या [१] उमा भेंडे यांनी मराठीशिवाय, छत्तीसगडी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही [१] भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटांतील अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे यांचे पती होत.
कारकीर्द
चित्रपट-कारकीर्द
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
इ.स. | अंगाई | मराठी | ||
इ.स. १९६० | आकाशगंगा | मराठी | पदार्पणातला पहिला चित्रपट | |
इ.स. १९६८ | आम्ही जातो आमुच्या गावा | मराठी | वैजयंती | |
इ.स. | काका मला वाचवा | मराठी | ||
इ.स. | दोस्ती | मराठी | ||
इ.स. | पाच रंगाची पाच पाखरे | मराठी | ||
इ.स. १९८७ | प्रेमासाठी वाट्टेल ते | मराठी | ||
इ.स. १९८० | भालू | मराठी | सज्जला | |
इ.स. | मधुचंद्र | मराठी | ||
इ.स. | मल्हारी मार्तंड | मराठी | ||
इ.स. | शेवटचा मालुसरा | मराठी | ||
इ.स. | स्वयंवर झाले सीतेचे | मराठी |
उमा भेंडे यांच्यावर चित्रित झालेली गाणी
- गंध फुलांचा गेला सांगुन (चित्रपट युगुलगीत, कवी - पी. सावळाराम; संगीत - विश्वनाथ मोरे; गायक/गायिका - सुरेश वाडकर, आशा भोसले; चित्रपट - भालू)
- गुडिया हमसे रूठेगी (हिंदी)
- हवास मज तू हवास (गायिका : आशा भोसले, संगीतकार : सुधीर फडके, चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा )
उमा भेंडे यांना मिळालेले पुरस्कार
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार
- चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार Archived 2021-09-07 at the Wayback Machine.
संदर्भ व नोंदी
- ^ a b "मला जीवनगौरव का नाही!". १३ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उमा भेंडे चे पान (इंग्लिश मजकूर)