Jump to content

उमा कुलकर्णी

डॉ. सौ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी, जन्म : बेळगाव, १ ऑक्टोबर १९५०) या मराठी अनुवादक आहेत. त्यांनी यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा शिवराम कारंत यांच्या कादंबरीचा 'तनमनाच्या भोवऱ्यात. हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. यानंतर कारंतांचेच 'डोंगराएवढा' हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले. पुढे उमा कुलकर्णी यांनी एस.एल. भैरप्पा यांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करायचा सपाटा लावला. सुरुवात भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' पासून सुरुवात करून २०१९ सालापर्यंत त्यांनी भैरप्पांच्याच एकूण बारा कादंबऱ्या अनुवादल्या आहेत.

सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक अनुवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.(सन २०१९ची स्थिती). सौ उमा कुलकर्णी यांनी सुनीता देशपांडे यांचे 'आहे मनोहर तरी' कानडीत आणले, पण त्याच्या प्रकाशनासाठी त्यांना बरीच वर्षे प्रकाशक मिळाला नाही. प्रकाशक म्हणाले, 'आम्ही आणि आमचे कानडी लोक पु.ल. देशपांडे यांना ओळखत नाहीत, तर त्यांच्या बायकोला शक्यच नाही. सुनीता देशपांडे यांचे पुस्तक कर्नाटकात खपणार नाही.'

कौटुंबिक

उमा कुलकर्णी यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण बेळगावमध्ये झाले. पदव्युत्तर शिक्षण पुण्यात एस.एन.डी.टी.काॅलेजात झाले. त्यांचे वडील बासरी वाजवायचे. घरात संगीताला पोषक वातावरण होते. १९७० विरूपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या.

सौ. उमा कुलकर्णी यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके (अपूर्ण यादी)

  • अग्नी (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक - यू.आर. अनंतमूर्ती)
  • अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक - यू.आर. अनंतमूर्ती)
  • आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • उत्तरकांड (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कन्नड लेखक - के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
  • काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'अंचू', लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कारंत चिंतन (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. शिवराम कारंत)
  • कुडीय (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. शिवराम कारंत)
  • केतकरवहिनी (आत्मकथनात्मक स्वतंत्र कादंबरी)
  • क्रौंचपक्षी (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका - वैदेही)
  • खेळता खेळता आयुष्य (अनुवादित आत्मचरित्र, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • चिदंबर रहस्य (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक - के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • जा ओलांडुनी (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'दाटु', लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • जिगर (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - श्रीधर अग्नी)
  • टिपू सुलतानचे स्वप्न (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • डॉलर बहू (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका - सुधा मूर्ती)
  • डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. शिवराम कारंत)
  • तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • तंतू (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • तनमनाच्या भोवऱ्यात (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. शिवराम कारंत)
  • तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • दोन म्हातारे आणि इतर कथा (अनुवादित; मूळ कन्नड लेखक - माधव कुलकर्णी)
  • नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • परिशोध (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'अवेषण', लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • परीघ (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका - सुधा मूर्ती)
  • पर्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा) . या कादंबरीच्या मराठीत १४ आवृत्त्या निघाल्या. १४व्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण २०१९ साली प्रकाशित झाले.
  • पारखा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'तब्बलियु नीनादे मगने' लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा) . या कादंबरीवर कानडी आणि हिंदी भाषांत चित्रपट निघाले; हिंदी चित्रपटाचे नाव - गोधुली.
  • पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा (अनुवादित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक - के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • फ्लॉरिस्टन बंगला (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - नरसिंह मळगी)
  • भैरप्पा साहित्य : मराठी समीक्षा (संपादित)
  • मंद्र (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • महाश्वेता (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखिका- सुधा मूर्ती)
  • माझं नाव भैरप्पा (अनुवादित आत्मचरित्र,; मूळ कन्नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • ययाती (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक - गिरीश कार्नाड)
  • वंशवृक्ष (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • वैदेही यांच्या निवडक कथा (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड - लेखिका वैदेही)
  • व्रत आणि इतर कथा (अनुवादित कथासंग्रह, मूळ कन्नड लेखक - फकीर मोहम्मद कात्पदी)
  • संवादु अनुवादु (आत्मचरित्र)
  • सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका - सुधा मूर्ती)
  • साक्षी (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. एस.एल. भैरप्पा)

सौ. उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाऊन्डेशनचा विशेष पुरस्कार (१९९७)
  • महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
  • रेखा ढोले पुरस्कार
  • 'संवादु अनुवादु'ला महाराष्ट्र साहित्य परिषद (मंगळवेढा, अखिल मराठी साहित्य परिषद (बडोदा), अश्वमेध ग्रंथालय (सातारा), साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) (सर्व सन २०१७मध्ये)
  • भास्करराव ग. माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (२०१७)
  • मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा प्रा. वि.ह. कुलकर्णी पुरस्कार (सन २०१८)
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (सन १९८९)
  • 'वंशवृक्ष'साठी महाराष्ट्रगौरव पुरस्कार (१९९०)
  • 'पर्व'साठी स.ह. मोडक पुरस्कार (१९९९)
  • 'पारखा'साठी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे म.बा. जाधव पुरस्कार (२०१५)
  • 'पारखा'साठी पुणे ग्रंथालयाचा वर्धापन पुरस्कार
  • कुवेंपु भाषाभारतीतर्फे विशेष सन्मान