उद्धव किशनराव भयवाळ
उद्धव किशनराव भयवाळ (जन्म : बदनापूर-जालना जिल्हा, १८ जून १९५०) हे एक मराठी साहित्यिक आहेत.
शिक्षण व नोकरी
मूळ गावातून १९६६ साली एस.एस.सी झाल्यावर उद्धव भयवाळ जालन्याला आले. तेथे ते जे.ई.एस. कॉलेजमधून फिजिक्स विषय घेऊन बी.एस्सी. झाले. त्यानंतर त्यांनी १९७३-२००६ या काळात स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये विविध पदांवर काम केले. तेथून २००६ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ते लेखनाकडे वळले.
उद्धव किशनराव भयवाळ यांनी लिहिलेली पुस्तके
- इंद्रधनुष्य (कवितासंग्रह)
- हसरी फुले (बालकविता संग्रह)
- याशिवाय काही एकांकिका व विनोदी कथा
मिळालेले पुरस्कार व सन्मान
- अंकुर वाङ्मय पुरस्कार (२००८)
- 'नवरत्न' पुरस्कारापैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार (दिनांक २५-०२-२०१६ रोजी पंढरपूर येथे)
- साहित्यसेवेबद्दल 'कलाकुंज ‘ प्रकाशनाच्या वतीने साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०१४ रोजी नाशिक येथे सत्कार.
- सुभेद्रा प्रतिष्ठान (सेलू-परभणी जिल्हा) यांच्यातर्फे व दाजी पणशीकर यांच्या हस्ते गौरव पुरस्कार (५ मार्च २०१२)