Jump to content

उद्धवबापू आपेगावकर

उद्धवबापू आपेगावकर हे एक मराठी पखवाजवादक आहेत.

त्यांनी फ्यूजन संगीतात पखवाजास स्थान मिळवून दिले आहे. त्यांनी आपल्या वादनाचे नमूने यू-ट्यूबवरही घातलेले आहेत. त्यांच्या कुटुंबात पखवाजवादनाची परंपरा असून त्यांचे वडील शंकरबापू आपेगावकर यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पखवाजवादनास राष्ट्रीय स्तरावर नेले. घरची शेती सांभाळून उद्धवबापू पखवाजवादन शिकले. त्यांनी धृपद गायकी, सूफी संगीत, शास्त्रीय संगीत, वारकरी संगीत अशा निरनिराळ्या प्रकारांत पखवाजवादनाला महत्त्व मिळवून दिले.

त्यांनी इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका, नेदरलँड्स आदी देशात त्यांच्या सातत्याने मैफली झाल्या. त्यांनी लंडनच्या ऑपेरा हाऊस मध्येही कार्यक्रम सादर केला आहे. याशिवाय ते परदेशांतही कार्यशाळा घेतात. परदेशी कलाकारांसोबत उद्धवबापूंनी फ्यूजन कार्यक्रम सादर करतात. ते चार पखवाजवादकांसह पखवाज तालस्पर्श नावाचा कार्यक्रमही करतात.

उद्धवबापू आपेगावात राहतात.