उदयन काळे
उदयन काळे (इ.स. १९६० - ३० डिसेंबर, इ.स. २०१२:पुणे, महाराष्ट्र) हे मराठी रंगभूमीवरचे एक गायक अभिनेते होते. त्यांनी काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते.
कारकीर्द
उदयन काळे यांनी आकाशवाणीमध्ये तंबोरा वादक म्हणून नोकरी केली. त्यांनी सर्वप्रथम संगीत शाकुंतल या नाटकात क्षमा वैद्य यांच्याबरोबर अभिनय केला. याशिवाय संगीत सौभद्र व संगीत स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्स्यगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्विनशेठ या उदयन काळे यांनी केलेल्या काही भूमिका होत.
त्यानी भरत नाट्य संशोधन मंदिराच्या बाबुराव विजापुरे यांच्याकडून संवादाचे शिक्षण घेतले.
प्रमुख भूमिका
लावणी भुलली अभंगाला मध्ये काळे यांनी वठवलेली निळोबाची भूमिका प्रसिद्ध झाली. या नाटकाचे त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोग केले.
उदयन काळे यांना मिळालेले पुरस्कार
- मराठी नाट्य परिषदेचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- कोरेगाव (सातारा) येथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार