Jump to content

उत्तर आयर्लंड

उत्तर आयर्लंड
Northern Ireland
Tuaisceart Éireann
Norlin Airlann
उत्तर आयर्लंडचा ध्वजउत्तर आयर्लंडचे चिन्ह
ध्वजचिन्ह
उत्तर आयर्लंडचे स्थान
उत्तर आयर्लंडचे स्थान
उत्तर आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बेलफास्ट
अधिकृत भाषाइंग्लिश, आयरिश
 - पंतप्रधानगॉर्डन ब्राउन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १३,८४३ किमी
लोकसंख्या
 -एकूण १७,७५,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१२२/किमी²
राष्ट्रीय चलनब्रिटिश पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभागग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय.uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक४४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


उत्तर आयर्लंड हा आयर्लंडच्या बेटावरील ईशान्येला वसलेला युनायटेड किंग्डममधील चार घटक देशांपैकी एक आहे (इतर तीन घटक देश: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स). १४,१३९ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या ह्या देशाने आयर्लंड बेटाचे एक षष्ठांश क्षेत्रफळ व्यापले आहे. ह्याच्या दक्षिणेस व पश्चिमेस आयर्लंडच्या प्रजासत्ताकाची सीमा आहे. २०११ मध्ये उत्तर आयर्लंडची लोकसंख्या १८,१०,८६३ इतकी होती.

उत्तर आयर्लंडची निर्मिती १९२१ साली झाली, ज्या वेळी आयर्लंड बेटाची फाळणी करण्यात आली. ब्रिटिश संसदेने आयर्लंडची उत्तर आयर्लंड आणि दक्षिण आयर्लंड मध्ये फाळणी केली. आयर्लंड या बेटावर राहणारे लोक क्रीस्चीन धर्मातील काथोलिक आणि प्रोटेस्टंट या पंथांमध्ये विभागले गेले आहेत. बेटाच्या उत्तरेस बहुसंख्य प्रोटेस्टंट राहतात आणि दक्षिणेस काथोलिक राहतात. प्रोटेस्टंट पंथातील लोक स्वताला ब्रिटिश समजतात आणि काथोलिक स्वतःला आयरिश समजतात. आयर्लंडच्या फाळणी नंतर बहुतांश काथोलिक लोक हे दक्षिण आयर्लंड मध्ये राहत होते पण तरी उत्तर आयर्लंड मध्येही त्याची संख्या लक्षणीय होती. दक्षिण आयर्लंड कालांतराने स्वतंत्र देश झाला पण उत्तर आयर्लंड आजही ब्रिटेनचा एक अविभाज्य घटकदेश आहे. परंतु उत्तर आयर्लंड मधील ह्या दोन पंथात आजही टोकाचे वैमनस्य आहे.