Jump to content

उखळ

उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. उखळ या शब्दावरून अनेक वाकप्रचार व म्हणीही निर्माण झाल्या आहेत. जुन्या काळी स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असणारे उखळ आता यंत्रांमुळे दुर्मिळ झाले आहे. उखळ हे पूर्वीपासून वापरले जाणारे साधन आहे.उखळावरती धान्य कांडले/सडले जाते .तांदूळ ,तीळ ही कुटले जातात .उखळ मध्ये धान्य टाकले की मुसळ हातात पकडायची आणि कुटायला सुरुवात करायची.