उंबलाचेरी गाय
उंबलाचेरी गाय | |
मूळ देश | भारत |
---|---|
आढळस्थान | किलालयुर , केलवेलूर, थलाईनायर(नागपट्टिनम जिल्हा) , तिरुमरुकल व तिरुवरुर जिल्ह्यातील तटीय क्षेत्र (तामिळनाडू) |
मानक | agris IS |
उपयोग | मशागतीचा गोवंश |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | मध्यम, त्रिकोणी आणि कपाळावर पांढरी निशाणी |
पाय | मध्यम काटक |
शेपटी | मध्यम पांढरी शेपटी |
तळटिपा | |
कपाळावर पांढरी निशाणी, पाय आणि विशेषतः खूर पांढरे सॉक्स घातल्यासारखे असून शेपूटसुद्धा पांढरी असते | |
|
उंबलाचेरी, उंबळाचेरी किंवा उंब्लाचेरी हा शुद्ध भारतीय पशुगोवंश असून, तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम व तिरुवरुर जिल्ह्यातील तटीय क्षेत्रात आढळतो. दरम्यानच्या काळात ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मध्यम उंची, कष्टकरी वृत्ती व ४.९ % पर्यंत फॅट असलेली मध्यम दुधाळू गाय यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे.[१]
चांगला खुराक दिल्यास ही गाय दिववसाला २ ते ४ लिटर दूध देते. परंतु मजबूत, मध्यम बुटका आणि काटक पाय यामुळे भातशेतीमध्ये प्रजातीचे बैल चांगले कामाला येतात. आणि यामुळेच हा गोवंश तामिळनाडूत प्रसिद्ध आहे.[२]
उगम
यांचा मूळ गोवंश कंगायम गाय आहे. तामिळनाडूमधील उंबळाचेरी या गावी या पशुगोवंशाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. यामुळेच यांना उंबलाचेरी असे नाव पडले. या व्यतिरिक्त मोशीमाडू, अडुक्करी गाय, वेन्नमाडू, सुर्यनकट्टुमाडू, गणपतीनाथ माडू, मोत्ताईमाडू, मोलाईमाडू, दक्षिणी गाय अशा विविध नावाने हा गोवंश ओळखला जातो.
शारीरिक रचना
लहानपणी हा गोवंश लाल रंगाचा असतो. एक वर्ष वयानंतर गाई फिक्कट ते गडद राखाडी आणि बैल गडद काळपट राखाडी रंगात परावर्तित होतात. डोके, मान, पाठ आणि पृष्ठभाग गडद रंगाचा, तर उर्वरित भाग फिकट किंवा पांढरट रंगाचा असतो. कपाळावर पांढरी निशाणी आणि खुर पांढरे सॉक्स घातल्या सारखे दिसतात. विशेष म्हणजे या गोवंशाची शेपूटसुद्धा पांढरी किंवा पांढऱ्या छटेत असते. या गोवंशाची शिंगे छोटी आणि तिरपी बाहेरच्या अंगाला वळलेली असतात. बैलाची उंची ११० सें मी आणि वजन ३८० किलो, गाईची उंची १०० सें मी आणि वजन ३२० किलोपर्यंत असते.
भारतीय गायीच्या इतर जाती
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
- ^ Valerie Porter, Lawrence Alderson, Stephen J.G. Hall, D. Phillip Sponenberg (2016). Mason's World Encyclopedia of Livestock Breeds and Breeding (sixth edition). Wallingford: CABI. आयएसबीएन 9781780647944.
- ^ "Lactation performance and milk constituents of Umblachery breed of cattle (Bos indicus) in its native coastal ecology of Tamilnadu, India". R Rajendran. Department of Animal Genetics and Breeding, Madras Veterinary College, Chennai, Tamilnadu, India. 16 May 2015 रोजी पाहिले.