इ.स. २०१५
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१५ हे इसवी सनामधील २०१५ वे, २१व्या शतकामधील १५वे तर २०१० च्या दशकामधील सहावे वर्ष असेल.
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १ लिथुएनिया देश युरो चलनाचा स्वीकार करून युरोक्षेत्रामधील १९वा देश झाला.
- जानेवारी ४ - २६ जानेवारी: २०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ऑस्ट्रेलिया देशामध्ये खेळवला गेला.
- फेब्रुवारी १४-२९ मार्च: २०१५ क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड देशांमध्ये खेळवला गेला.
- एप्रिल २५ - नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
- सप्टेंबर २४ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.
- ऑक्टोबर ३१ - कोगालिमाव्हिया फ्लाइट ९२६८ हे एरबस ए३२१ प्रकारचे विमान उत्तर साइनाई द्वीपकल्पावर कोसळले. २२४ ठार.
- नोव्हेंबर १४ - फ्रांसची राजधानी पॅरिस वर इसिसचा दहशतवादी हल्ला.
- नोव्हेंबर २३ - जम्मूत भाविकांना वैष्णोदेवीच्या दर्शनाला घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कटरा येथे कोसळून सात भाविक ठार.
जन्म
मृत्यू
जानेवारी २ - वसंत गोवारीकर - भारतीय शास्त्रज्ञ. जुलै २७- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती.