इ.स. १९९०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० - १९९१ - १९९२ - १९९३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३ - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
- जानेवारी ४ - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
- एप्रिल २४ - हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.
- मे ४ - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- मे २२ - उत्तर यमन व दक्षिण यमन यमनचे प्रजासत्ताक या नावाने एकत्र झाले.
- जुलै २७ - बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- जुलै २७ - त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
- जुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट २ - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
- ऑगस्ट १० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
- ऑगस्ट ३० - तातारस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- डिसेंबर १२ - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
- डिसेंबर २२ - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी
जन्म
- जून ४ - जेत्सुन पेमा वांग्चुक, भूतानाची राणी.
मृत्यू
- फेब्रुवारी २३ - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १८ - यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.