इ.स. १९८९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० - १९९१ - १९९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-मार्च
- जानेवारी ४ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिब्याच्या २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.
- जानेवारी १० - क्युबाने ॲंगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
- जानेवारी ३० - अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
- फेब्रुवारी २ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
- फेब्रुवारी ३ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.
- फेब्रुवारी ८ - इंडिपेंडंट एरचे बोईंग ७०७ जातीचे विमान एझोर्स बेटावरील सांता मरिया डोंगरावर कोसळले. १४४ ठार.
- फेब्रुवारी १४ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.
- फेब्रुवारी १४ - ईराणच्या रुहोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खुनाचा फतवा काढला.
- फेब्रुवारी २४ - रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
- फेब्रुवारी २४ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.
- फेब्रुवारी २७ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
- मार्च ७ - चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये लश्करी कायदा लागु केला.
एप्रिल-जून
- एप्रिल १९ - यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
- एप्रिल २१ - चीनची राजधानी बैजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- जून ५ - चीनची राजधानी बिजींगच्या त्येनानमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
- जून ७ - सुरिनामची राजधानी पारामारिबो येथे डी.सी.८ प्रकारचे विमान कोसळले. १६८ ठार.
- जून २१ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
जुलै-सप्टेंबर
- जुलै १९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.
- जुलै २० - म्यानमारच्या सरकारने ऑॅंग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
- ऑगस्ट ९ - कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
ऑक्टोबर-डिसेंबर
- डिसेंबर २ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
- डिसेंबर १४ - पॅट्रिशियो एल्विन चिलीच्या अध्यक्षपदी.
- डिसेंबर १६ - रोमेनियातील क्रांति - हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
- डिसेंबर २२ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
- डिसेंबर २२ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- डिसेंबर २९ - वाक्लाव हावेल झेकोस्लोव्हेकियाच्या अध्यक्षपदी.
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी ६ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.
- फेब्रुवारी १४ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- जुलै ११ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटिश अभिनेता.
- सप्टेंबर १६ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- सप्टेंबर २८ - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.