इ.स. १९८८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९८५ - १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० - १९९१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- डिसेंबर २१ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
- फेब्रुवारी १३ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- एप्रिल २८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
- जून २७ - फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉॅं रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
- जुलै ३ - अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने ईराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
- जुलै ६ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
- जुलै ३१ - मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
- ऑगस्ट ८ - म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.
- ऑगस्ट १० - दुसऱ्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
- ऑगस्ट १७ - विमान अपघातात पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
== जन्म
==
मृत्यू
- जानेवारी १६ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
- मार्च ८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
- ऑगस्ट १४ - आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
- ऑगस्ट १७ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.