Jump to content

इ.स. १९८७

सहस्रके:इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे
वर्षे: १९८४ - १९८५ - १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९०
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • मार्च ६ - एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ ही ब्रिटिश फेरीबोट बेल्जियमच्या झीब्रुग बंदरात बुडाली. १९३ ठार.
  • एप्रिल २१ - श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
  • मे ९ - पोलंडच्या लॉट एरलाइन्सचे आय.एल.६२एम. जातीचे विमान वॉर्सोच्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
  • मे ११ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात सर्वप्रथम हृदय व फुप्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
  • मे १७ - इराकच्या लढाउ विमानाने अमेरिकेच्या यु.एस.एस. स्टार्क या जहाजावर अस्त्रहल्ला केला. ३७ सैनिक ठार, २१ जखमी.
  • जुलै ३१ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
  • ऑगस्ट ९ - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
  • ऑगस्ट १६ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
  • डिसेंबर २१ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.

जन्म

मृत्यू