इ.स. १९७०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९६७ - १९६८ - १९६९ - १९७० - १९७१ - १९७२ - १९७३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
- फेब्रुवारी १५ - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी.९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
- फेब्रुवारी २१ - स्वित्झर्लंडच्या झुरिक शहराजवळ स्विस एर फ्लाइट ३३० मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
- मार्च २ - ऱ्होडेशिया प्रजासत्ताक झाले.
- एप्रिल ११ - अपोलो १३चे प्रक्षेपण.
- एप्रिल १३ - अपोलो १३मधील ऑक्सिजन टॅंकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
- एप्रिल १७ - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- एप्रिल २४ - चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉॅंग फॅंग हॉॅंग १चे प्रक्षेपण.
- एप्रिल २४ - गाम्बिया प्रजासत्ताक झाले.
- एप्रिल २८ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
- मे ४ - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी.
- मे ९ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेत ८०,००० व्यक्तिंची व्हाईट हाउस समोर निदर्शने.
- मे ११ - अमेरिकेच्या लबक शहरात एफ.५ टोर्नेडो. २६ ठार.
- मे १५ - व्हियेतनाम युद्ध - जॅक्सन स्टेट युनिव्हर्सिटीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. १ ठार.
- मे १७ - थॉर हायरडाल मोरोक्कोहून अटलांटिक महासागर पार करण्यासाठी रा २ या कागद व वनस्पतींपासून तयार केलेल्या नावेतून निघाला.
- मे ३१ - पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.
जुलै-डिसेंबर
- जुलै ३ - ईंग्लंडचे डी हॅविललॅंड कॉमेट प्रकारचे विमान स्पेनमध्ये बार्सेलोना शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
- जुलै ५ - एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- जुलै २१ - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
जन्म
- जानेवारी २ - ॲंथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी २१ - मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- मार्च ११ - ब्रेट लिडल, दक्षिण आफ्रिकेचा गोल्फपटू.
- मार्च ११ - इव्हगेनी कोरेश्कोव्ह, हॉकीपटू, इ.स. १९९८ मधील ऑलिम्पिक्स क्रीडास्पर्धेत कझाकिस्तान संघाकडून सहभाग.
- मे ४ - पॉल वाईझमन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- मे ८ - मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- मे १६ - गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.
- मे २३ - यिगाल अमीर, इस्रायेलच्या पंतप्रधान यित्झाक राबिनचा मारेकरी.
- मे २५ - मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून १९ - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.
- जून २८ - मुश्ताक अहमद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- जुलै ७ - मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै २८ - पॉल स्ट्रॅंग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जुलै १० - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- जुलै २४ - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- सप्टेंबर १८ - जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
- सप्टेंबर २८ - गमाल अब्दल नासर, इजिप्तचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- नोव्हेंबर २१ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ.