इ.स. १९३२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ - १९३३ - १९३४ - १९३५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ६ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- फेब्रुवारी ६ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
- मार्च १ - चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले.
- एप्रिल २८ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
- मे १२ - अपहरण झाल्यावर अडीच महिन्यांनी चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा मृत अवस्थेत सापडला.
- मे १५ - जपानमध्ये उठाव. पंतप्रधान इनुकाई त्सुयोशीची हत्या.
- जुलै १२ - हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
- जुलै २० - जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.
- जुलै ३१ - जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
जन्म
- मार्च ११ - नाइजेल लॉसन, ब्रिटिश सरकारी अधिकारी.
- मार्च ११ - व्हॅलेरी फ्रेंच, इंग्रजी अभिनेत्री.
- मार्च २५ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
- एप्रिल १५ - सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
- मे ९ - कॉन्राड हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून ८ - सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून ८ - रे इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
- ऑगस्ट १७ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
- सप्टेंबर १२ - वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर २५ - अडोल्फो सुआरेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २६ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- ऑक्टोबर ५ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.