इ.स. १९२४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२१ - १९२२ - १९२३ - १९२४ - १९२५ - १९२६ - १९२७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २५ - फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी ८ - अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात विषारी वायुने मृत्युदंड देण्यास सुरू केले.
- फेब्रुवारी १४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.
- मे ४ - १९२४ उन्हाळी ऑलिंपिक पॅरिसमध्ये सुरू.
- मे १० - जे. एडगर हूवर अमेरिकेच्या एफ.बी.आय.च्या निदेशकपदी. हूवर १९७२ पर्यंत या पदावर होता.
- मे ३१ - सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.
- जून ५ - अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
- जून २६ - अमेरिकेच्या सैन्याने डॉमिनिकन प्रजासत्ताकमधून माघार घेतली.
- जुलै २० - ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
जन्म
- एप्रिल २८ - केनेथ कॉॅंडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मे २४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.
- जून १२ - जॉर्ज बुश , अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष.
- जून २७ - रॉबर्ट ऍपलयार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट १ - फ्रॅंक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर १४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
- डिसेंबर १४ - राज कपूर, भारतीय अभिनेता.
मृत्यू
- फेब्रुवारी ३ - वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- मे २५ - आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.
- जून ८ - जॉर्ज मॅलोरी, इंग्लिश गिर्यारोहक.
- जून ८ - अँड्रु अर्व्हाइन, इंग्लिश गिर्यारोहक.
- ऑगस्ट १७ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.