इ.स. १९१४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २० - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
- मे ९ - जे.टी. हर्न प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
- जून २८ - सर्बियाच्या नागरिक गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने सारायेवो येथे ऑस्ट्रियाचा आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची हत्या केली. पहिल्या महायुद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
- जून २९ - सायबेरियात जिना गुसेव्हाने रास्पुतिनचा खून करण्याचा प्रयत्न केला.
- जुलै २८ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- ऑगस्ट १ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- ऑगस्ट ३ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- ऑगस्ट १५ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- ऑगस्ट १७ - पहिले महायुद्ध-स्टालुपॉनेनची लढाई - जर्मनीचा रशियन सैन्यावर विजय.
जन्म
- जानेवारी ४ - इंदिरा संत,मराठी कवियत्री
- फेब्रुवारी ७ - रमोन मर्काडेर, लिओन ट्रॉट्स्कीचा मारेकरी.
- मार्च ११ - राल्फ एलिसन, लेखक, इनव्हिजिबल मॅन कलाकृतीचा निर्माता.
- एप्रिल २० - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
- मे १५ - तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणाऱ्या एडमंड हिलरी यांचे सहकारी.
- जून २६ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
- जुलै ७ - अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
- सप्टेंबर ७ - नॉर्मन मिचेल-इनेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २५ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
मृत्यू
- जून २८ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
- जून २८ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
- सप्टेंबर २८ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.