इ.स. १९०८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०५ - १९०६ - १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
- एप्रिल २७ - लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
- जून ३० - तुंगस्का स्फोट.
- जुलै ६ - रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- जुलै १३ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रीयांना भाग घेण्यास परवानगी.
- जुलै २५ - किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
जन्म
- फेब्रुवारी २३ - विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
- मार्च ११ - लॉरेन्स वेल्क, ऑर्केस्ट्रॉ नेता.
- एप्रिल २६ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- एप्रिल २८ - ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
- जून २२ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक
- जुलै २५ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - साल्व्हादोर अलेंदे चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ३० - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- फेब्रुवारी १ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- मे ९ - संत धोंडीबुवा पलुसचे संत.