इ.स. १९०६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०३ - १९०४ - १९०५ - १९०६ - १९०७ - १९०८ - १९०९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मार्च ८ - अमेरिकेच्या सैन्याने फिलिपाईन्समध्ये डोंगरात लपुन बसलेल्या ६०० व्यक्तिंची कत्तल केली.
- एप्रिल १८ - कॅलिफोर्नियात सान फ्रांसिस्को येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
- मे २२ - अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरू. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.
- मे २२ - राइट बंधूंना त्यांच्या उडणाऱ्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.
जन्म
- जानेवारी १७ - शकुंतलाबाई परांजपे, भारतीय समाजसेविका.
- जानेवारी १९ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.
- फेब्रुवारी ७ - ओलेग ऍन्तोनोव्ह, रशियन विमानशास्त्रज्ञ.
- फेब्रुवारी ७ - पुयी, चिनी सम्राट.
- फेब्रुवारी १९ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- मार्च ११ - आसान फेरिट अल्नार, रचनाकार.
- सप्टेंबर १ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर १० - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
- ऑक्टोबर १४ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
मृत्यू
- एप्रिल १९ - पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
- मे २३ - हेन्रिक इब्सेन, नॉर्वेचा लेखक.
- ऑगस्ट २९ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.