इ.स. १८७२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८६९ - १८७० - १८७१ - १८७२ - १८७३ - १८७४ - १८७५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- नोव्हेंबर ३० - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
- मार्च १ - यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
- मे २२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रॅंटने अमेरिकन गृहयुद्धात दक्षिणेकडून लढलेल्या वा दक्षिणेबद्दल सहानुभूती असलेल्या ५०० व्यक्तींना माफी जाहीर केली.
जन्म
- मार्च ११ - अब्राहम व्हॅन स्टॉक, कलासंग्राहक.
- मे १८ - बर्ट्रान्ड रसेल, इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ.
- जून ६ - अलेक्झांड्रा, रशियाची झारिना.
- जुलै १५ - जॉस एन्रिक रोड मॉन्टेव्हिडियो, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
- ऑगस्ट ३ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- ऑगस्ट १५ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञ.
- ऑगस्ट १८ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
- डिसेंबर १२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.