इ.स. १२४०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२२० चे - १२३० चे - १२४० चे - १२५० चे - १२६० चे |
वर्षे: | १२३७ - १२३८ - १२३९ - १२४० - १२४१ - १२४२ - १२४३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- हिवाळा - बाटु खानच्या नेतृत्त्वाखाली चालून आलेल्या मोंगोल सैन्याने थिजलेली ड्नाइपर नदी पार केली व आत्ताच्या युक्रेन मधील क्यीव शहराला वेढा घातला. आपल्या बरोबर चीनमधून आणलेल्या उखळी यंत्रांनी दगडफेक करून मोंगोलांनी क्यीवची तटबंदी धूळीत घातली व शहरात घुसले. पाशवी हातघाईच्या लढाईत क्यीवच्या सैनिकांनी शहराच्या मध्यभागात माघार घेतली. तेथे चर्च ऑफ द ब्लेसेड मेरी मध्ये सैनिक व नागरिकांनी आश्रय घेतला. मोंगोलांनी चालू ठेवलेल्या माऱ्यापासून दूर म्हणून मोठा जमाव चर्चच्या गच्चीवर गेला. त्या वजनाने चर्चचे छत खाली असलेल्या लोकांवर कोसळून शेकडो ठार झाले. उरलेल्यांची मोंगोलांनी कत्तल केली. या हल्ल्यात क्यीवमधील सुमारे ५०,००० लोकांपैकी फक्त २,००० लोक वाचले होते.[१]
जन्म
मृत्यू
- लेओनार्दो फिबोनाची, इटालियन गणितज्ञ.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Perfecky, George (1973). The Hypatian Codex, pp. 43–49. Munich, Germany: Wilhelm Fink Publishing House.