इस्रायलचे पंतप्रधान
इस्रायलचे पंतप्रधान | |
---|---|
इस्रायलचे पंतप्रधानांचा ध्वज | |
शैली | महामहिम |
नियुक्ती कर्ता | इस्रायलचे राष्ट्रपती |
कालावधी | ४ वर्ष (कमाल) |
निर्मिती | १४ मे १९४८ |
पहिले पदधारक | डेव्हिड बेन-गुरियन |
संकेतस्थळ | pmo.gov.il |
इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासून बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.
पात्रता, अधिकार आणि कर्तव्ये
इस्त्रायलची लिखीत राज्यघटना नाही; पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे एखाद्या देशाच्या राज्यघटने सारखे महत्त्वाचे आहेत. इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायलचे नागरिक असणे व ते क्नेसेट मध्ये निवडुन यावे गरजेचे आहे. पंतप्रधान व इतर मंत्रीमंडळ मिळून इस्रायलचे सरकार बनते. उपपंतप्रधान या पदाची पण सोय पण मूलभूत कायद्यात आहे. निवडणुकी नंतर पंतप्रधान होण्यासाठी बहुसंख्य पाठींबा असलेला व्यक्ति इस्रायलच्या राष्ट्रपतींकडे आपली उमेदवारी देतो आणि निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्या नंतर सात दिवसाच्या आत राष्ट्रपती पंतप्रधान जाहिर होतो. पंतप्रधानांच्या मृत्युच्या वेळी हा कालावधी चौदा दिवसांचा असतो ज्यात नव्या अथवा प्रभारी पंतप्रधानाची नियुक्ती होते.[१]
यादी
एकूण बारा लोक इस्रायलचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणापत्र वर १४ मे १९४८ला स्वाक्षरी करण्यात आले. त्यानंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून १४ मे १९४८ ते १० मार्च १९४९ पंतप्रधान होते. पंतप्रधानांच्या पहिल्या निवडणुकीत बेन-गुरियन निवडले गेले. पुढे अनेक वेळा ते निवडुन आले. २६ जानेवारी १९५४ पदभार सांभाळणारे मोशे शॅरेड हे इस्रायलचे दुसरे पंतप्रधान ठरले. ३ नोव्हेंबर १९५५ला बेन-गुरियन पुन्हा विजयी ठरले. व एकूण १३ वर्ष आणि १२७ दिवस ते पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून पदस्त असण्याचा हा सर्वात जास्त कालावधी आहे. तिसरे पंतप्रधान लेव्हि एश्कॉल २६ जून १९६३ पासून त्यांच्या मृत्यू पर्यंत, २६ फेब्रुवारी १९६९, पदस्त होते. त्यांच्या निधनानंतर यिगाल एलोन हे प्रभारी पंतप्रधान झाले ज्यानंतर गोल्डा मायर ह्या १७ मार्च १९६९ला देशाच्या चौथ्या पंतप्रधान झाल्या. मायर देशाच्या पहिल्या व आजतागायत एकमेव महिला पंतप्रधान होत्या. १९९५ मध्ये यित्झाक राबिन पंतप्रधान पदी असताना तेल अवीवला एका शांतता रॅली मध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली.[२]
खालील नमुद केलेली पंतप्रधानांची यादी आहे:[३]
रंग | दल |
---|---|
मपई / इस्रायली लेबर पार्टी / अलाइनमेंट (इस्रायल) | |
लिकुड | |
कदिमा | |
यमीना |
क्र. | नाव (जन्म–मृत्यू) | चित्र | राजकीय पक्ष | कार्यकाल | नियुक्त (क्नेसेट) | ||
---|---|---|---|---|---|---|---|
१ | डेव्हिड बेन-गुरियन (१८८६–१९७३) | मपई | १४ मे १९४८ | १० मार्च १९४९ | — | ||
१० मार्च १९४९ | १ नोव्हेंबर १९५० | १९४९ (१वे) | |||||
१ नोव्हेंबर १९५० | ८ ऑक्टोबर १९५१ | ||||||
८ ऑक्टोबर १९५१ | २४ डिसेंबर १९५२ | १९५१ (२वे) | |||||
२४ डिसेंबर १९५२ | २६ जानेवारी १९५४ | ||||||
२ | मोशे शॅरेड (१८९४-१९६५) | मपई | २६ जानेवारी १९५४ | २९ जून १९५५ | |||
२९ जून १९५५ | ३ नोव्हेंबर १९५५ | ||||||
(१) | डेव्हिड बेन-गुरियन (१८८६-१९७३) | मपई | ३ नोव्हेंबर १९५५ | ७ जानेवारी १९५८ | १९५५ (३वे) | ||
७ जानेवारी १९५८ | १७ डिसेंबर १९५९ | ||||||
१७ डिसेंबर १९५९ | २ नोव्हेंबर १९६१ | १९५९ (४वे) | |||||
२ नोव्हेंबर १९६१ | २६ जून १९६३ | १९६१ (५वे) | |||||
३ | लेव्हि एश्कॉल (१८९५-१९६९) | मपई | २६ जून १९६३ | २२ डिसेंबर १९६४ | |||
२२ डिसेंबर १९६४ | १२ जानेवारी १९६६ | ||||||
अलाइनमेंट (इस्रायल) मपई/इस्रायली लेबर पार्टी | १२ जानेवारी १९६६ | २६ फेब्रुवारी १९६९ | १९६५ (६वे) | ||||
— | यिगाल एलोन (प्रभारी) (१९१८–१९८०) | अलाइनमेंट (इस्रायल) इस्रायली लेबर पार्टी | २६ फेब्रुवारी १९६९ | १७ मार्च १९६९ | |||
४ | गोल्डा मायर (१८९८-१९७८) | अलाइनमेंट (इस्रायल) इस्रायली लेबर पार्टी | १७ मार्च १९६९ | १५ डिसेंबर १९६९ | |||
१५ डिसेंबर १९६९ | १० मार्च १९७४ | १९६९ (७वे) | |||||
१० मार्च १९७४ | ३ जून १९७४ | १९७३ (८वे) | |||||
५ | यित्झाक राबिन (१९२२-१९९५) | अलाइनमेंट (इस्रायल) इस्रायली लेबर पार्टी | ३ जून १९७४ | २० जून १९७७ | |||
६ | मेनाकेम बेगिन (१९१३-१९९२) | लिकुड | २० जून १९७७ | ५ ऑगस्ट १९८१ | १९७७ (९वे) | ||
५ ऑगस्ट १९८१ | १० ऑक्टोबर १९८३ | १९८१ (१०वे) | |||||
७ | यित्झाक शामिर (१९१५-२०१२) | लिकुड | १० ऑक्टोबर १९८३ | १३ सप्टेंबर 1984 | |||
८ | शिमॉन पेरेझ (१९२३-२०१६) | अलाइनमेंट (इस्रायल) इस्रायली लेबर पार्टी | १३ सप्टेंबर १९८४ | २० ऑक्टोबर १९८६ | १९८४ (११वे) | ||
(७) | यित्झाक शामिर (१९१५-२०१२) | लिकुड | २० ऑक्टोबर १९८६ | २२ डिसेंबर १९८८ | |||
२२ डिसेंबर १९८८ | ११ जून १९९० | १९८८ (१२वे) | |||||
११ जून १९९० | १३ जुलै १९९२ | ||||||
(५) | यित्झाक राबिन (१९२२-१९९५) | इस्रायली लेबर पार्टी | १३ जुलै १९९२ | ४ नोव्हेंबर १९९५[२] | १९९२ (१३वे) | ||
(८) | शिमॉन पेरेझ (१९२३-२०१६) | इस्रायली लेबर पार्टी | (प्रभारी, ४ नोव्हेंबर १९९५) २२ नोव्हेंबर १९९५ | १८ जून १९९६ | |||
९ | बिन्यामिन नेतान्याहू (१९४९–) | लिकुड | १८ जून १९९६ | ६ जुलै १९९९ | १९९६ | १४वे | |
१० | एहूद बराक (१९४२–) | वन इस्रायल इस्रायली लेबर पार्टी | ६ जुलै १९९९ | ७ मार्च २००१ | १९९९ | १५वे | |
११ | एरियेल शॅरन (१९२८-२०१४) | लिकुड | ७ मार्च २००१ | २८ फेब्रुवारी २००३ | २००१ | ||
२८ फेब्रुवारी २००३ | २१ नोव्हेंबर २००५ | २००३ (१६वे) | |||||
कदिमा | २१ नोव्हेंबर २००५ | (४ जानेवारी २००६) १४ एप्रिल २००६ | |||||
१२ | एहूद ओल्मर्ट (१९४५–) | कदिमा | (प्रभारी, ४ जानेवारी २००६) १४ एप्रिल २००६ | ४ मे २००६ | |||
४ मे २००६ | ३१ मार्च २००९ | २००६ (१७वे) | |||||
(९) | बिन्यामिन नेतान्याहू (१९४९–) | लिकुड | ३१ मार्च २००९ | १८ मार्च २०१३ | २००९ (१८वे) | ||
१८ मार्च २०१३ | ६ मे २०१५ | २०१३ (१९वे) | |||||
६ मे २०१५[४] | ९ एप्रिल २०१९ | २०१५ (२०वे) | |||||
९ एप्रिल २०१९ | १७ मे २०२० | एप्रिल २०१९ (२१वे) सप्टेंबर २०१९ (२२वे) | |||||
१७ मे २०२० | १३ जून २०२१ | २०२० (२३वे) | |||||
१३ | नफ्ताली बेनेट (१९७२–) | यमीना | १३ जून २०२१ | ३० जून २०२२ | २०२१ (२४वे) | ||
१४ | याइर लापिड (१९६३–) | येश अटिड | १ जुलाई २०२२ | पदस्ठ |
संदर्भ
- ^ "Basic Law: The Government (2001)" (इंग्रजी भाषेत). १४ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "Yitzhak Rabin assassinated" (इंग्रजी भाषेत). १६ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "All Prime Ministers of Israel" (इंग्रजी भाषेत). १४ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ जोडी रॅडरेन. "Netanyahu Forms an Israeli Government, With Minutes to Spare" (इंग्रजी भाषेत). १६ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)