इस्तंबूल प्रांत
इस्तंबूल İstanbul ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
इस्तंबूलचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | इस्तंबूल |
क्षेत्रफळ | ५,३१३ चौ. किमी (२,०५१ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,३८,५४,७४० |
घनता | २,५५१ /चौ. किमी (६,६१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-34 |
संकेतस्थळ | www.istanbul.gov.tr |
इस्तंबूल (तुर्की: İstanbul ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला काळा समुद्र व दक्षिणेकडे मार्माराचा समुद्र आहेत. बोस्फोरस ही सामुद्रधुनी इस्तंबूल प्रांताला युरोप व आशिया गटांमध्ये विभागते. इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित असून १.३८ कोटी लोकसंख्या असलेला इस्तंबूल प्रांत ह्या बाबतीत तुर्कस्तानमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत