इसापूर धरण
इसापूर धरण | |
अधिकृत नाव | इसापूर धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यातील इसापुर गावानजीक हे धरण पैनगंगा नदीच्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
इसापूर धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
इसापुर धरण हे एक संपुर्ण मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी पूर्णा प्रकल्प म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :- क्षेत्रफळा च्या दृष्टीने इसापुर धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [संपूर्ण मातीच्या धरणा]] पैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्षीण ८ किमी आहे.
उपयोग:- सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात पेयजल उपलब्ध करन्यात साठी सुद्धा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातील असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. मेहकर तालुक्यातील टाकळी जवळ "पेनटाकळी" नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच इसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:- सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्यटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही. शासनाने जलाशय सभोवती इसापुर पक्षी अभयारण्य व नंतर इसापुर प्राणी अभयारण्य प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात. गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ फकिर शाह" बाबा दरगाह आहे. संदल १६ फेब्रुवारी व ११ एप्रिल ला असतो; तरी भाविक भक्त, श्रद्धाळु नेहमी येत असतात. धरणाच्या भिंतीला लागुन सातेफळ हनुमान मन्दिर असुन जवळच सैलानीबाग येथे (केटी खान) कासीम खान गांजापुरी च्या शेतात सैलानी दरबार दर्गाह आहे. जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत अंचुळेश्वर मंदीर आहे.
राहण्याची व्यवस्था:- राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:- जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्थानक हिंगोली ३० किमी अंतरावर आहे . हुजूर साहेब नांदेड पासून ८० किमी
पुसद , हदगांवव उमरखेड पासून थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.