इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी
इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी ही एक चिटफंड कंपनी आहे.
राजेश दिनकर कांबळे आणि पत्नी विद्या कांबळे यांनी साथीदार अजय माधव प्रभुदेसाई आणि अमोल चंद्रकांत शहा यांच्या मदतीने पुण्यातील कोंढवा परिसरात ही कंपनी सुरू केली. कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला गुंतवलेल्या रकमेवर पाच टक्के अधिक परतावा मिळेल आश्वासन त्यांनी गुंतवणूकदारांना दिले. कोंढवा परिसरासह शहरातील २५० ते ३०० नागरिकांकडून त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले. ग्राहकांना विश्वास बसण्यासाठी भागीदारांनी सुरुवातीला त्यांना परतावा दिला. गुंतवणूकदारांची संख्या वाढल्यावर परतावा देण्यास नकार देऊन भागीदार पळून गेले.
या कंपनीत गुंतवणूक केलेल्या सदस्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अजय प्रभुदेसाई व अमोल शहा या दोघांना आर्थिक गुन्हे पथकाने जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात अटक केली. इ.स. २००९ ते २०१६ या सात वर्षांत या आरोपींनी पुण्यातील सुमारे तीनशे नागरिकांची साडेदहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
परदेशात पळून गेलेला मुख्य आरोपी राजेश दिनकर कांबळे आणि त्याची फरार झालेली पत्नी विद्या राजेश कांबळे यांचा शोध घेण्यात येत आहे.
गुन्हे