Jump to content

इवा कोलस्टॅड

इवा कोलस्टॅड

नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्सची १८ वी अध्यक्षा
कार्यकाळ
१९५६ – १९६८
मागील सिग्ने स्वेन्सन

युनायटेड नेशन्स कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन ची सदस्या
कार्यकाळ
१९६९ – १९७५

सरकारचे प्रशासन आणि ग्राहक व्यवहार मंत्री
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर १९७२ – १६ ऑक्टोबर १९७३
मागील इंगर लुईस वॅले

नॉर्वे लिबरल पक्षाची अध्यक्षा
कार्यकाळ
९ मार्च १९७४ – २७ मार्च १९७६
मागील हेल्गे रोग्नलिएन

नॉर्वेचे लैंगिक समानतेची लोकपाल
कार्यकाळ
१९७८ – १९८८

इवा सेवरीन लुंडगार्ड कोलस्टॅड (६ मे १९१८ - २६ मार्च १९९९) ही एक नॉर्वेजियन राजकारणी आणि लिबरल पक्षाची सरकारी मंत्री होती. तिचे जन्मनाव इवा सेवरीन लुंडगार्ड हार्टविग होते. नॉर्डिक देशांमधील उदारमतवादी स्त्रीवादी आणि राज्य स्त्रीवादाच्या विकासाच्या इतिहासातील हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होती. तिने नॉर्वे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये लैंगिक समानतेसाठी धोरणे राबविली. तिने नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्स (१९५६ - १९६८)च्या अध्यक्षा, युनायटेड नेशन्स कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन (१९६९ - १९७५)च्या सदस्या आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले. कोरवाल्डच्या मंत्रिमंडळात नॉर्वेचे सरकारी प्रशासन आणि ग्राहक व्यवहार मंत्री (१९७२ - १९७३), लिबरल पक्षाची नेता (१९७४ - १९७६) आणि नॉर्वेजियन लैंगिक समानता लोकपाल (१९७८ - १९८८) तसेच जगभरातील पहिली लैंगिक समानता लोकपाल म्हणून काम केले.

प्रारंभिक जीवन

इवा कोलस्टॅडचा जन्म १९१८ मध्ये नॉर्वेच्या हॅल्डन येथे झाला.[] महिलांच्या हक्कांसाठी सक्रिय होण्यापूर्वी तिने बुककीपिंग शिक्षिका म्हणून काम केले.[][]

कारकीर्द

कोलस्टॅड ही १९७४ ते १९७६ पर्यंत लिबरल पक्षाची नेता होती. ती नॉर्वेमधील पहिली महिला पक्षाची नेता होती. ती लिंग समानतेसाठी नॉर्वे आणि जगातली पहिली लोकपाल होती. राजकारणाबाहेर तिने लेखापाल म्हणून काम केले.[]

१९५३ च्या निवडणुकीत त्या अल्पवयीन मतपत्रिका उमेदवार होती. परंतु ती निवडून आली नाही. १९५७ – १९६१ आणि १९६५ – १९६९ या कालावधीत तिने ओस्लो येथून नॉर्वेच्या संसदेत उपप्रतिनिधी म्हणून काम केले. दरम्यान १९६१ च्या निवडणुकीत लिबरल मतपत्रिकेवर ती हेल्गे सीपच्या मागे उपविजेती होती. परंतु लिबरल लोकांचा एकही खासदार निवडून आला नव्हता. १९७२ - १९७३ मध्ये कोरवाल्ड मंत्रिमंडळात ती प्रशासन आणि ग्राहक व्यवहार मंत्री होती. स्थानिक पातळीवर त्या १९६० ते १९७५ या काळात ओस्लो शहर परिषदेच्या कार्यकारी समितीची सदस्य होती.[]

कोलस्टॅड ही सेंट ओलावची कमांडर होती. तीला १९८६ मध्ये सेंट हॉलवर्डचे पदक मिळाले होते.[][]

वैयक्तिक जीवन

तिचे लग्न राग्नार कोलस्टॅड यांच्याशी झाले होते. तो न्याय मंत्रालयातील वकील आणि सहाय्यक महासंचालक होता. तिचे सासरे पंतप्रधान पेडर कोलस्टॅड होते.[]

संदर्भ

  1. ^ a b Commire, Anne (2007). Dictionary of Women Worldwide: 25,000 Women Through the Ages. Detroit: Yorkin Publications. p. 1049. ISBN 0787675857.
  2. ^ a b c d e "Eva Kolstad". Norsk biografisk leksikon. Kunnskapsforlaget. 1999–2005."Eva Kolstad". Norsk biografisk leksikon. Kunnskapsforlaget. 1999–2005.
  3. ^ "सांख्यिकी नॉर्वे" (PDF).