Jump to content

इर्तिश नदी

इर्तिश
ओम्स्क येथे इर्तिशचे पात्र
इर्तिश नदीच्या मार्गाचा नकाशा
उगमआल्ताय पर्वतरांग
मुखओब नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशचीन, कझाकस्तान, रशिया
लांबी ४,२४८ किमी (२,६४० मैल)
सरासरी प्रवाह २,१५० घन मी/से (७६,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १६.४३ लाख
ह्या नदीस मिळतेओब नदी

इर्तिश (रशियन: Иртыш; कझाक: Ертiс / Yertis; चिनी: 额尔齐斯河; उय्गुर: ئېرتىش; मंगोलियन: Эрчис мөрөн; तातर: Иртеш) ही सायबेरियामधील एक प्रमुख नदीओब नदीची उपनदी आहे. इशिम नदी, ऑम नदी, तोबोल नदी आणि तारा नदी इर्तिशच्या प्रमुख उपनद्या आहेत.

इर्तिश चीनच्या शिंच्यांग प्रांतामधील आल्ताय पर्वतरांगेमध्ये उगम पावते. तेथून कझाकस्तान मार्गे साधारणपणे आग्नेय दिशेस वाहत जाऊन ती ओब नदीला मिळते. ओब-इर्तिशचे पाणलोट क्षेत्र आशियामधील महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे.

ओम्स्क, तोबोल्स्क व खान्ती-मान्सीस्क ही इर्तिश नदीच्या किनाऱ्यावरील रशियामधील प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत