Jump to content

इराणचे आखात

पर्शियन आखाताचा नकाशा

इराणचे आखात ऊर्फ पर्शियन आखात हा मध्यपूर्वेतील इराणला अरबी द्वीपकल्पापासून वेगळा करणारा हिंदी महासागराचा एक भाग आहे. ह्या आखाताला कधीकधी अरबी आखात असेही संबोधले जाते. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानचे आखातअरबी समुद्राशी जोडते.

इराणच्या आखाताच्या भोवताली इराण, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरैन, कुवेतइराक हे देश आहेत. ९८९ किमी लांबीच्या ह्या आखाताच्या पूर्व टोकाला होर्मुझची सामुद्रधुनी तर पश्चिम टोकाला युफ्रेटिसतैग्रिस ह्या नद्यांच्या संगमामधून निर्माण झालेला त्रिभुज प्रदेश आहे.

१९८०-८८ दरम्यान झालेल्या इराण–इराक युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून इराणच्या आखातातील शत्रूंच्या तेलवाहू जहाजांवर बॉंबहल्ले केले गेले होते.