Jump to content

इराण

इराण
جمهوری اسلامی ايران
जोम्हुरीये एस्लामीये ईरान
इराणचे इस्लामी प्रजासत्ताक
इराणचा ध्वजइराणचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: एस्तेक्लाल, आझादी, जोम्हुरीये एस्लामी
राष्ट्रगीत: सोरूद-ए मेल्ली-ए जोम्हुरी-ए एस्लामी-ए ईरान
इराणचे स्थान
इराणचे स्थान
इराणचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तेहरान
अधिकृत भाषाफारसी
 - राष्ट्रप्रमुखअयातोल्ला अली खामेनेई (सर्वेसर्वा)
मोहम्मद मोखबर (कार्यकारी राष्ट्राध्यक्ष)
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (इराणी राजसत्ता उलथून क्रांती)
फेब्रुवारी ११, १९७९ (घोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण १६,४८,१९५ किमी (१८वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ६,८४,६७,४१३ (१८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५४.८ अब्ज अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न७,९८० अमेरिकन डॉलर (७४वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनइराणी रियाल (IRR)
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+३:३०
आय.एस.ओ. ३१६६-१IR
आंतरजाल प्रत्यय.ir
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+९८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.

ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत

ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत

इराण, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अधिकृत नाव असलेला, पश्चिम आशियातील एक देश आहे. हा देश वायव्येकडून तुर्कस्तान, आर्मेनिया आणि अझरबैजान प्रजासत्ताक, उत्तरेकडून कॅस्पियन समुद्र, ईशान्येकडून तुर्कमेनिस्तान, पूर्वेकडून अफगाणिस्तान, आग्नेयेकडून पाकिस्तान आणि ओमान समुद्र आणि दक्षिणेकडून पर्शियन गल्फ यांच्या सीमेवर आहे. आणि होर्मुझची सामुद्रधुनी पश्चिमेकडून इराकला लागून आहे. 1,648,195 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला, हा देश मध्य पूर्वेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातील 18 वा सर्वात मोठा देश आहे. इराणची लोकसंख्या 86 दशलक्षाहून अधिक आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ते 17 व्या क्रमांकावर आहे. इराण 31 प्रांतांमध्ये विभागलेला आहे. या देशाची अधिकृत भाषा फारसी आहे. इराणमधील सर्वात मोठी शहरे अनुक्रमे तेहरान (राजधानी), मशहद, इस्फाहान, काराज आणि शिराज आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

"इराण" हा शब्द थेट मध्य पर्शियन "एरान" पासून आला आहे. एरान हा शब्द पहिल्यांदा रुस्तम शिल्पाकृतीतील तिसऱ्या शतकातील शिलालेखात प्रथम सापडतो. इराणच्या लोकांसांदर्भात "आर्यन" या शब्दाचा वापर करणारा पार्थियन शिलालेखही सोबत सापडला आहे. एका इराणी पौराणिक कथेनुसार, देशाचे नाव इराज ह्या प्रख्यात राजपुत्राच्या नावावरून ठेवले आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, इराणला पश्चिमी देशांत पर्शिया म्हणून संबोधिले गेले आहे, प्रामुख्याने ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामुळे ज्यांनी इराणचा संपूर्ण उल्लेख "पर्सिस" नावाने केला होता. अर्थात "पर्शियन लोकांची भूमी." पर्सीस इराणमधील प्राचीन प्रांतांपैकी एक होता, ज्याची व्याख्या आज फार्स म्हणून केली जाते.

१९३५ साली रेझा शाह यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला देशाचे मूळ नाव "इराण" वापरण्यास विनंती केली.

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोहम्मद मोसादिक यांच्या नेतृत्वाखाली , १९५३ साली लोकशाहीवादी चळवळ दडपली गेली यामध्ये अमेरिकेच्या सी आय एचा हात होता असे मानतात कारण त्यांना इंग्लंड व अमेरिकेचे संबंध जपायचे होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून शहा रेझा पहलवी यांना पदच्युत केले गेले त्यानंतर अयातुल्ला खोमेनी इराण मध्ये परतले. त्यांनी इराणचे कट्टर इस्लामीकरण केले

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

इराण हा शियाबहुल इस्लामी देश आहे.

  • पारशी - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणाऱ्यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन गुजरात राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात पारशी असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरू झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. मुंबई येथील अनेक इराणी उपहारगृहे हीच मंडळी चालवीत असत.

शिक्षण

संस्कृती

इराणचा प्रसिद्ध कवी फिरदौसी हा होय.

राजकारण

अर्थतंत्र

इराण मध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेल असल्याने अनेक राष्ट्रांना इरानच्या राजकारणात रस आहे. हे तेल इराण आपल्याला आणि आपण सांगू त्याच भावात विकावे यासाठी मोठा आंतराष्ट्रीय दबाव इराणवर टाकण्यात येत असतो. अणु कार्यक्रमाची सुरुवात केल्याने. इराणवर अमेरिका व इतर राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. परंतु भारत मात्र येथील नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे मिळवत आहे. त्यासाठीचे मूल्य रुपयात अदा करता येईल अशी व्यापारी रचनाही आता अस्तित्वात आणण्यात आली आहे. इराणमध्ये केशराचे उत्पादनही होते. इराण मध्ये पिकणारे केशर हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते.

हे सुद्धा पहा

  • बाबक खुर्रामुद्दिन

बाह्य दुवे