Jump to content

इडन गार्डन्स

ईडन गार्डन्स
ইডেন গার্ডেন্স
मैदान माहिती
स्थानकोलकाता
गुणक22°33′52″N 88°20′36″E / 22.56444°N 88.34333°E / 22.56444; 88.34333गुणक: 22°33′52″N 88°20′36″E / 22.56444°N 88.34333°E / 22.56444; 88.34333
स्थापना १८६४
आसनक्षमता ६६,०००
मालकभारतीय लष्कर[]
प्रचालक क्रिकेट असोशिएशन बंगाल
यजमानबंगाल क्रिकेट संघ
कोलकाता नाईट रायडर्स
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.५-८ जानेवारी १९३४:
भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा.३० सप्टें-३ ऑक्टो २०१६:
भारत  वि. न्यू झीलंड
प्रथम ए.सा.१८ फेब्रुवारी १९८७:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा.२२ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
प्रथम २०-२०२९ ऑक्टोबर २०११:
भारत वि. इंग्लंड
अंतिम २०-२०३ एप्रिल २०१६:
इंग्लंड वि. वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
बंगाल क्रिकेट संघ (१९०८-सद्य)
कोलकाता नाईट रायडर्स (२००८ - सद्य)
शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६
स्रोत: ईडन गार्डन्स, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
इडन गार्डन्स is located in Kolkata
इडन गार्डन्स
इडन गार्डन्स
इडन गार्डन्स (Kolkata)

इडन गार्डन्स (बंगाली: ইডেন গার্ডেন্স) हे कोलकाता, भारत येथील क्रिकेटचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघ आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे ते घरचे मैदान असून कसोटी क्रिकेट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.[] ६६,००० आसनक्षमतेनुसार ते भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून मेलबर्न क्रिकेट मैदाना खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. इडन गार्डनला "कलोसियमला क्रिकेटचे उत्तर" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.[] क्रिकेट विश्वचषक, ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणाऱ्या लॉर्ड्सचा क्रमांक लागतो.

मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.[]

इतिहास आणि क्षमता

Ground of the Calcutta Cricket Club, 15th Jan'y. 1861 H.M. 68th L.I. from Rangoon, versus the Calcutta Cricket Club

१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरून दिले गेले होते.[] मैदान शहराच्या बी. बी. डी. बाग क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आहे. सुरुवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतु नंतर बायबल मधील इडन गार्डनवरून प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.[] मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी मैदानाचे नूतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे.[][]; नूतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हणले जाते, परंतु त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.[]

मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.[] इडन गार्डनवर खेळवले गेलेले हिरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.[] इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणाऱ्या आणि गलका करणाऱ्या प्रेक्षकांबद्दल ओळखले जाते. असे म्हणले जाते की "गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही."[१०][११] बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांच्या नावावरून दिले गेले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. आयपीएलचे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड आहे.

उल्लेखनीय घटना

  • १९४६ साली, फॉर्मात असलेल्या मुश्ताक अलीला ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी ("नो मुश्ताक,नो टेस्ट" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले.[१२]
  • १९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.[]
  • १६ ऑगस्ट १९८० च्या पूर्व बंगाल आणि मोहन बागान संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.[१३]
  • क्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
  • हिरो चषक, १९९३-९४ मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेल्या, शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना, फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.[१४]
  • भारतीय फलंदाजी कोसळल्याने प्रेक्षकांनी व्यत्यय आणलेला, क्रिकेट विश्वचषक, १९९६ मधील भारत वि. श्रीलंका उपांत्य सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला.[]
  • पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७च्या दुसऱ्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.
  • १९९९ मध्ये, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा धक्का लागल्याने धावचीत झाला. अख्तरने तेंडुलकरच्या मार्गात अडथळा आणला आणि गर्दीचा क्षोभ झाला, त्यामुळे पोलिसांन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढावे लागले. सामना रिकाम्या मैदानात सुरू राहिला.[१५]
  • कपिल देवने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.[१६]
  • हरभजन सिंगने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[१७]
  • व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.[१८][१९]
  • इडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.
  • १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने १७३ चेंडूंत २६४ धावा करून इतिहास रचला.[२०]
  • ३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष स्पर्धा वेस्ट इंडीजच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकल्या.

विक्रम

  • मैदानावरील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम चार धावसंख्या भारताने नोंदवल्या आहेत. २००१ मध्ये ६५७-७, २०१० मध्ये ६४३-६, १९९८ मध्ये ६३३-५, आणि २०११ मध्ये ६३१-७.[२१]
  • मैदावार सर्वाधिक कसोटी धावा व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या नावावर आहेत (१२७१ धावा), त्याखालोखाल राहुल द्रविड (९६२ धावा) आणि सचिन तेंडुलकर (८७२ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो.[२२]
  • मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा विक्रम हरभजनसिंगच्या नावे आहे. त्याने एकूण ४६ बळी घेतले आहेत, त्यानंतर अनिल कुंबळेने ४० तर बिशनसिंग बेदीने २९ गडी बाद केले आहेत.[२३]
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावरी सर्वाधिक धावसंख्या ५ बाद ४०४ ही २०१४ साली भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती. त्याखालोखाल २००९ मध्ये भारताने ३१७-५, आणि श्रीलंकेने २००९ मध्येच ३१५ धावा केल्या होत्या.[२४]
  • मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय धावा सचिन तेंडुलकरने केल्या आहेत (४९६ धावा), त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने ३३२ आणि श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्व्हाने ३०६ धावा केल्या.[२५]
  • इडन गार्डन्सवर सर्वात जास्त १४ बळी घेतले ते अनिल कुंबळे आणि कपिल देवने (१४ बळी) त्यापाठोपाठ जवागल श्रीनाथ ८ बळी आणि रवींद्र जडेजा व अजित आगरकरने ७ बळी घेतले आहेत.[२६]
  • इडन गार्डन्सवर सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड दरम्यान २००१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यामधील पाचव्या गड्यासाठीची ३७६ धावांची आहे.[२७] आणि एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट भागीदारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीर आणि विराट कोहली दरम्यान २२४ धावांची आहे.[२८]
  • व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि मोहम्मद अझरुद्दीन ह्या दोघांनी ह्या मैदानावर प्रत्येकी ५ शतके केली आहेत.
  • १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या.

नूतनीकरण

कोलकाता मधील इमारतींमध्ये मैदानावरचे प्रकाशझोत
क्रिकेट विश्वचषक, २०११ नूतनीकरणाआधी मैदान

क्रिकेट विश्वचषक, २०११ आधी इडन गार्डन्सच्या नूतनीकरणाचे काम घेतले गेले.[२९] क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बंगाल क्रिकेट असोसिएशनने मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नूतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरूप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करून ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.

नूतनीकरणाच्या अपुऱ्या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.[३०]

मैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केन्या वि झिम्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या ति किटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे.[३१]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
५-८ जानेवारी १९३४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
३० डिसेंबर १९५१ - ४ जानेवारी १९५२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१२ - १५ डिसेंबर १९५२भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
२ - ६ नोव्हेंबर १९५६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया९४ धावाधावफलक
३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१ डाव आणि ३३६ धावाधावफलक
२३ - २८ जानेवारी १९६०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
३० डिसेंबर १९६० - ४ जानेवारी १९६१भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
३० डिसेंबर १९६१ - ४ जानेवारी १९६२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत१८७ धावाधावफलक
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९६४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१७ - २२ ऑक्टोबर १९६४भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
५ - ८ मार्च १९६५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१ डाव आणि ४५ धावाधावफलक
१२ - १६ डिसेंबर १९६९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१० गडीधावफलक
३० डिसेंबर १९७२ - ४ जानेवारी १९७३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत२८ धावाधावफलक
२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत८५ धावाधावफलक
१ - ६ जानेवारी १९७७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१० गडीधावफलक
२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
२६ - ३१ ऑक्टोबर १९७९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८०भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
१ - ६ जानेवारी १९८२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१० - १४ डिसेंबर १९८३भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१ डाव आणि ४६ धावाधावफलक
३१ डिसेंबर १९८४ - ५ जानेवारी १९८५भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
११ - १६ फेब्रुवारी १९८७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
२६ - ३१ डिसेंबर १९८७भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९९३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका३२९ धावाधावफलक
१८ - २१ मार्च १९९८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत१ डाव आणि २१९ धावाधावफलक
१६ - २० फेब्रुवारी १९९९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान४६ धावाधावफलक
११ - १५ मार्च २००१भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत१७१ धावाधावफलक
३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर २००२भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००४भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
१६ - २० मार्च २००५भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत१९५ धावाधावफलक
३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २००७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
१४ - १८ फेब्रुवारी २०१०भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत१ डाव आणि ५७ धावाधावफलक
१४ - १७ नोव्हेंबर २०११भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत१ डाव आणि १५ धावाधावफलक
५ - ९ डिसेंबर २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड७ गडीधावफलक
६ - ८ नोव्हेंबर २०१३भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत१ डाव आणि ५१ धावाधावफलक
३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०१६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत१७८ धावाधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३२]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१८ फेब्रुवारी १९८७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२ गडीधावफलक
२३ ऑक्टोबर १९८७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड४ गडीधावफलक
८ नोव्हेंबर १९८७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया७ धावाधावफलक
२ जानेवारी १९८८भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत५६ धावाधावफलक
२८ ऑक्टोबर १९८९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान७७ धावाधावफलक
१ नोव्हेंबर १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान४ गडीधावफलक
३१ डिसेंबर १९९०बांगलादेशचा ध्वज बांगलादेशश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका७१ धावाधावफलक
४ जानेवारी १९९१भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
१० नोव्हेंबर १९९१भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत३ गडीधावफलक
२४ नोव्हेंबर १९९३भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत२ धावाधावफलक
२५ नोव्हेंबर १९९३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज७ गडीधावफलक
२७ नोव्हेंबर १९९३भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत१०२ धावाधावफलक
५ नोव्हेंबर १९९४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत७२ धावाधावफलक
१३ मार्च १९९६भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाबहालधावफलक
२७ मे १९९७पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका८५ धावाधावफलक
३१ मे १९९८भारतचा ध्वज भारतकेन्याचा ध्वज केन्याभारतचा ध्वज भारत९ गडीधावफलक
१९ जानेवारी २००२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत२२ धावाधावफलक
१८ नोव्हेंबर २००३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३७ धावाधावफलक
१३ नोव्हेंबर २००४भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान६ गडीधावफलक
२५ नोव्हेंबर २००५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१० गडीधावफलक
८ फेब्रुवारी २००७भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअनिर्णितधावफलक
२४ डिसेंबर २००९भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
१५ मार्च २०११आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१३१ धावाधावफलक
१८ मार्च २०११आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडFlag of the Netherlands नेदरलँड्सआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड६ गडीधावफलक
२० मार्च २०११केन्याचा ध्वज केन्याझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१६१ धावाधावफलक
२५ ऑक्टोबर २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत९५ धावाधावफलक
३ जानेवारी २०१३भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान८५ धावाधावफलक
२० ऑक्टोबर २०१४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरद्दधावफलक
१३ नोव्हेंबर २०१४भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत१५३ धावाधावफलक
२२ जानेवारी २०१७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड५ धावाधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३३]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२९ ऑक्टोबर २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड६ गडीधावफलक
८ ऑक्टोबर २०१५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकारद्दधावफलक
१६ मार्च २०१६बांगलादेशचा ध्वज बांगलादेशपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान५५ धावाधावफलक
१७ मार्च २०१६अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका६ गडीधावफलक
१९ मार्च २०१६भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२६ मार्च २०१६बांगलादेशचा ध्वज बांगलादेशन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड७५ धावाधावफलक
३ एप्रिल २०१६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज४ गडीधावफलक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "ऐतिहासिक इडन गार्डन्स बीसीसीआयसाठी: सीएबी अध्यक्ष". इंडिया.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "इडन गार्डन्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे". बीबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ a b "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ बॅग, शमिक. "इडनच्या सावलीमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "इडन गार्डन्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार". इकॉनॉमिक टाइम्स. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "हीरो चषक, १९९३-९४" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "इडन गार्डन्स हेरिटेज प्लॉट ऑफ रेकॉर्ड्स रोमान्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "हॅज इडन गार्डन्स लॉस्ट इट्स आयकॉनिक ग्लोरी" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "दुर्दैवाने, ते आज प्रतिभावान खेळाडूकडे पाहत नाहीत: रेडीफची मुश्ताक अली सोबत मुलाखत" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "सचिन टाईज देम डाऊन". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "द रन-आऊट दॅट स्पार्क्ड अ रायट" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "नोंदी / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "फोर्स्ड टू फॉलो-ऑन येट वन". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "बॉर्डर गावस्कर चषक – २री कसोटी". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वोत्तम धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वोत्तम धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार. वर्ल्ड इंटेरियर डिझाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "भारत-इंग्लंड विश्वचषक सामना इडन गार्डन्सवर होणार नाही" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ बसू, रिथ. "एम्प्टी एंड टू इडन्स कप – ॲंड द रोअर डाइड: जस्ट १५ मॅच-डे टिकेट्स सोल्ड फॉर झिम्बाब्वे-केन्या टाय" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.