Jump to content

इटालियन द्वीपकल्प

इटलीचे अवकाशचित्र

इटालियन द्वीपकल्प (इटालियन: Penisola italiana) हा दक्षिण युरोपामधील तीन मोठ्या द्वीपकल्पांपैकी एक आहे (इबेरियन द्वीपकल्पबाल्कन हे इतर दोन). इटली ह्या देशाचा मोठा भाग ह्या द्वीपकल्पावरच स्थित आहे. तसेच सान मरिनो व व्हॅटिकन सिटी हे दोन सार्वभौम देश देखील इटालियन द्वीपकल्पावर वसले आहेत.

१,३१,३३७ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या इटालियन द्वीपकल्पाच्या उत्तरेला आल्प्स पर्वतरांग, पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, दक्षिणेस आयोनियन समुद्र तर पश्चिमेस तिऱ्हेनियन समुद्र हे भूमध्य समुद्राचे उपसमुद्र आहेत. नैऋत्येस सिसिली हे मोठे इटालियन बेट मेसिनाच्या सामुद्रधुनीने प्रमुख भूमीपासून अलग केले आहे.