इज्जतनगर
इज्जतनगर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बरैली शहराचा एक भाग आहे. येथे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय, डीझेल लोको शेड तसेच रेल्वे यांत्रिकी कार्यशाळा आहेत. याशिवाय इज्जतनगर मध्ये केन्द्रीय पक्षी संशोधन संस्था, भारतीय पशु संशोधन संस्था आणि हार्टमन कॉलेज या संस्थाही आहेत.
भारतीय वायुसेनेचा त्रिशूल वायुसेना तळ येथे आहे.