Jump to content

इच्छापूर

  ?इच्छापूर

मध्य प्रदेश • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमुक्ताईनगर
भाषामराठी,हिंदी

इच्छापूर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सीमेवर वसलेले एक गाव आहे. हे गाव मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात आहे. मुक्ताईनगर पासून १६ किलोमीटर अंतरावर आहे.[]

भूगोल

इच्छापूर समुद्रसपाटीपासून २५१ मीटर उंचीवर वसलेले आहे. गावालगत दक्षिणेस ३०० मीटर उंच शिखर असलेला सातपुडा पर्वत आहे.हे गाव मुक्ताईनगर- शहापूर रस्त्यावर वसलेले आहे. मुक्ताईनगर सर्वात जवळचे शहर आहे ते इच्छापूरपासून १६ किमी अंतरावर आहे. गावात केळी पीक सर्वाधिक घेतले जाते.

धार्मिकस्थळ

ईच्छादेवी मंदिर

इच्छापूर गाव इच्छादेवीचे तीर्थस्थान सल्याने उत्तर महाराष्ट्रात आणि आजू बाजूला आलेल्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे. गावा नाजिक दक्षिणेस असलेल्या पहाडावर इच्छादेवी मंदिर आहे. ईच्छादेविच्या नावावरून या गावाला ईच्छापुर हे नाव पडले[] मंदिर मुक्ताईनगर - इच्छापुर रस्त्यावर आहे. नवरात्री उत्सवा दरम्यान मंदिरात भक्त जणांची खूप गर्दी येथे असते[].

संदर्भ

  1. ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
  2. ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
  3. ^ इसे, प्रमोद (२०१८). "ईच्छापुर्ण करणारे ईच्छापुर मंदिर". जळगाव , महाराष्ट्र.: महाराष्ट्र टाइम्स. pp. १.