Jump to content

इक्ष्वाकु कुळ

भारतीय महकाव्यांमध्ये उल्लेखित, इक्ष्वाकु कूळ हे मनू च्या सहा पुत्रांपैकी एक असलेल्या राजा इक्ष्वाकुपासून सुरू झालेले वैदिक काळातील आर्य राजघराणे होते. ह्या घराण्यालाच सूर्यवंश म्हणून देखील ओळखले जाते. ह्यामध्ये क्षत्रिय वर्णातील महत्त्वाच्या वंशावळींचा समावेश होतो. हिंदू धर्मातील भगीरथ,सगर,हरिश्चंद्र सारखे महापुरूष भगवान विष्णुं चे अवतार भगवान राम, जैन संदर्भानुसार,प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि इतर 22 तीर्थंकर ह्याच कुळात जन्मले.बौद्ध साहित्य आणि परंपरानुसार,गौतम बुद्धदेखील ह्याच कुळात अवतरित झाले होते. भारतीय उपखंडातील नंतरच्या अनेक राजांनी ह्या कुळाची पार्श्वभूमी असल्याचा दावा केला होता. ह्या कुळात भगीरथ,दशरथ,राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.

हे सुद्धा पहा