Jump to content

इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम

पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थानमोहाली
स्थापना १९९३
आसनक्षमता २६,०००
मालक पंजाब क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ (१९९३-सद्य)
पंजाब क्रिकेट संघ (१९९३-सद्य)
किंग्स XI पंजाब (२००८-सद्य)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१० - १४ डिसेंबर १९९४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा.२६ - ३० नोव्हेंबर २०१६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा.२२ नोव्हेंबर १९९३:
भारत वि. वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा.२२ सप्टेंबर २०२३ २०२३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२०१२ डिसेंबर २००९:
भारत वि. श्रीलंका
अंतिम २०-२०२७ मार्च २०१६:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१६
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान हे चंदिगढ जवळ मोहाली येथे वसलेले एक क्रिकेट मैदान आहे. ते बहुतेकदा मोहाली स्टेडियम म्हणून ओळखले जाते. सदर मैदान हे पंजाब क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. मैदानाच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये २५ कोटी इतका खर्च आला आणि पूर्ण होण्यास ३ वर्षांचा कालावधी लागला.[] मैदानाची अधिकृत प्रेक्षकक्षमता २६,९५० इतकी आहे.[]. मैदानाची रचना अरून लुंबा आणि असोशिएट, पंचकुला यांची असून बांधकाम आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी, चंदिगढ यांनी केले आहे.[]

येथे प्रकाशझोताचे दिवे इतर क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत अपारंपरिक आहेत. जवळच्या चंदिगढ विमानतळावरून उड्डाण करण्याऱ्या विमानांच्या सुरक्षिततेसाठी येथील दिव्यांच्या खांबाची उंची फार कमी आहे. आणि त्यामुळे मैदानावर १६ फ्लडलाईट आहेत.

हे मैदान भारतातील १९ वे आणि नवीन कसोटी मैदानांपैकी एक आहे. मैदानाची खेळपट्टीचा एकदम जिवंत आणि तेज गोलंदाजांना मदत करणारी असा नावलौकिक आहे. परंतु अलिकडे (डिसेंबर २०११) ती काहीसी मंदावली असून फिरकी गोलंदाजांनाही मदत करु लागली आहे. २२ नोव्हेंबर १९९३ रोजी हिरो चषक स्पर्धेदरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याने मैदानाचे उद्घाटन झाले.

त्यानंतरच्या मोसमात १० डिसेंबर १९९४ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. ह्या मैदानावर झालेल्या चित्तथरारक सामन्यांपैकी एक होता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान १४ मार्च १९९६ रोजी झालेला क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना. क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये पीसीए मैदानावर ३ सामने खेळवले गेले, त्यामधलाच एक खिळवून ठेवणारा सामना होता ३० मार्च २०११ रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा दुसरा उपांत्य सामना, ज्यात भारताने बाजी मारली. ह्या सामन्यास एकमेकांदरम्यानचे संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे युसफ रझा गिलानी हे उपस्थित होते.

पीसीए मैदान हे आयपीएल फ्रँचायझी किंग्स XI पंजाबचे होम ग्राउंड आहे. परंतु त्यांचे मोहालीमधील प्रदर्शन अगदी साधारण असेच आहे.

मैदानाच्या सध्याच्या खेळपट्टीचे क्युरेटर दलजीत सिंग.[] आणि रचना सल्लागार Ar. सुफ्यां अहमद हे आहेत. भारतीय खेळपट्ट्यांपैकी ही एक सर्वात हिरवी खेळपट्टी आहे आणि बाकिचे मैदानसुद्धा हिरवेगार असल्याने, चेंडूची लकाकी जास्तवेळ राहते आणि तेज गोलंदाज त्याचा फायदा जास्तीत जास्त वेळ घेऊ शकतात. मोहालीची खेळपट्टी नंतर नंतर मंद होते आणि फलंदाजांसाठी नंदनवन ठरते.

स्वतंत्रता चषक किंवा फ्रिडम ट्रॉफी स्पर्धेची पहिली कसोटी मोहाली येथे खेळवली गेली. ह्या कसोटीमध्ये, भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून खूप मदत मिळाली आणि भारताच्या गोलादाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चाचपडत खेळताना दिसले. तीन दिवसांत संपलेल्या ह्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०८ धावांनी दणदणीत पराभव केला. मोहाली मध्ये फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून इतकी मोठी मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

महत्त्वाच्या नोंदी

कसोटी मधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = न्यू झीलंड ६३०-६घो वि भारत, २००३-०४ मोसम.

कसोटी मधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = भारत ८३ वि न्यू झीलंड, १९९९-०० मोसम.

एकदिवसीय सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = दक्षिण आफ्रिका ३५१-५ वि नेदरलँड्स, क्रिकेट विश्वचषक, २०११.

एकदिवसीय सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान ८९ वि दक्षिण आफ्रिका २००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = भारत २११-४ वि श्रीलंका, २००९-१० मोसम.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान १५८-५ वि न्यू झीलंड, आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६.

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१०-१४ डिसेंबर १९९४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२४३ धावाधावफलक
१९-२३ नोव्हेंबर १९९७भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअनिर्णितधावफलक
१०-१४ ऑक्टोबर १९९९भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
३-६ डिसेंबर २००१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत१० गडीधावफलक
१६-२० ऑक्टोबर २००३भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
८-१२ मार्च २००५भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
९-१३ मार्च २००६भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत९ गडीधावफलक
१७-२१ ऑक्टोबर २००८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत३२० धावाधावफलक
१९-२३ डिसेंबर, २००८भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१-५ ऑक्टोबर २०१०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत१ wicketधावफलक
१४-१८ मार्च २०१३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
५-७ नोव्हेंबर २०१५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत१०८ धावाधावफलक
२६-२९ नोव्हेंबर २०१६भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२२ नोव्हेंबर १९९३भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत४३ धावाधावफलक
१४ मार्च १९९६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया५ धावाधावफलक
९ नोव्हेंबर १९९६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत५ धावाधावफलक
९ मे १९९७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२२ धावाधावफलक
२४ मे १९९७पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका११५ धावाधावफलक
१४ मे १९९८भारतचा ध्वज भारतबांगलादेशचा ध्वज बांगलादेशभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
१ एप्रिल १९९९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान७ गडीधावफलक
१० मार्च २००२भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत६४ धावाधावफलक
२८ ऑक्टोबर २००५भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
७ ऑक्टोबर २००६बांगलादेशचा ध्वज बांगलादेशश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका३७ धावाधावफलक
२५ ऑक्टोबर २००६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड५१ धावाधावफलक
२७ ऑक्टोबर २००६पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१२४ धावाधावफलक
२९ ऑक्टोबर २००६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया६ गडीधावफलक
१ नोव्हेंबर २००६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३४ धावाधावफलक
८ नोव्हेंबर २००७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान४ गडीधावफलक
२ नोव्हेंबर २००९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२४ धावाधावफलक
३ मार्च २०११Flag of the Netherlands नेदरलँड्सदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२३१ धावाधावफलक
११ मार्च २०११आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज४४ धावाधावफलक
३० मार्च २०११भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत२९ धावाधावफलक
२० ऑक्टोबर २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
२३ जानेवारी २०१३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
१९ ऑक्टोबर २०१३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया४ गडीधावफलक
२३ ऑक्टोबर २०१६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१२ डिसेंबर २००९भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२२ मार्च २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२२ धावाधावफलक
२५ मार्च २०१६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१ धावाधावफलक
२७ मार्च २०१६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
मैदानाचे संपूर्ण दृश्य

संदर्भ आणि नोंंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2015-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "भारतीय प्रीमियर लीग २०१० मैदाने" (इंग्रजी भाषेत). 2010-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ बसु, रिथ. "इडन पुनर्विकास". द टेलिग्राफ (इंग्रजी भाषेत). कोलकागा, भारत. २९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. क्रिकइन्फो.कॉम. ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.