Jump to content

इंद्र

इंद्रदेव

इंद्रदेव

देवांचा राजा - इत्यादींची अधिपती देवता

मराठीइंद्र
संस्कृतइन्द्रः
कन्नडಇಂದ್ರ
तमिळஇந்திரன்_(இந்து_சமயம்)
निवासस्थानइंद्र(स्वर्ग)लोकातील अमरावती
लोकस्वर्ग
वाहनऐरावत नावाचा हत्ती, उच्चैःश्रवस्‌ नावाचा घोडा
शस्त्रवज्र, शंब, पवीर, भाला, धनुष्यबाण, अरप, निधा
वडीलकश्यप
आईअदिति
पत्नीइंद्राणी/ शची
अपत्येजयंत, जयंती
अन्य नावे/ नामांतरेसहस्राक्ष, वज्रपाणि, पुरंदर, मघवन्‌, हरिश्मश्रु, शक्र
नामोल्लेखऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण,
इन्द्र - ऐरावतावर आरूढ असलेला

ऋग्वेदातील इंद्र ही हिंदू धर्मातली एक प्रमुख देवता आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत. हिंदू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. इंद्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमपा असे नाव आहे.[]

इंद्राणी ही इंद्रपत्‍नी असून ती सूक्तद्रष्टी आहे. इंद्राणीला अखण्ड सौभाग्यवतीपद पावलेले आहे. म्हणून लग्नात वाङ्‌निश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे.

इंद्राचे देऊळ मात्र कोठेही नाही. इंद्रालाच देवेंद्र, सुरेंद्र,अमरेंद्र, वज्रपाणि, सहस्राक्ष, वसावा, पुरंदर, शक्र, सोमपा, मेषवृषण अशा विविध नावांनी ओळखले जाते. इंद्र हा सुरांचा म्हणजेच देवांचा राजा म्हणून देवेंद्र किंवा सुरेंद्र म्हणतात. इंद्राच्या हाती वज्र हे दधिची ऋषींंच्या अस्थीपासून बनलेले शस्त्र असल्याकारणाने इंद्राला वज्रपाणि म्हणून ओळखले जाते, पाणि म्हणजे हात. तसेच इंद्राला सहस्र म्हणजे हजार अक्ष म्हणजे डोळे असल्यामुळे सहस्राक्ष सुद्धा म्हणतात.

इंद्रपद

इंद्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे. आतापर्यंत या पदावर बसलेली माणसे (एकूण २१): अद्भुत, ऊर्जस्विन, देवास्पती, पुरंदर (महाबल), प्रल्हाद, बलि, भवानुभव (मनोजव, मंत्रदुम), भूतधामन (ऋतुधामन), यज्ञ, रजि (आयुपुत्र), रोचक, विपश्चित, विभू (विधु), विश, विश्वभुुज, शक्र, शिखि (त्रिशिख, शिबी), सत्यजित, सूची, सुशांती ऊर्फ सुकीर्ती, हिरण्यकशिपु आणि रावणपुत्र मेघनाद.


  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला