इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था
educational institution in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | संशोधन संस्था | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था ही गोरेगाव,मुंबई येथील अर्थशास्त्र, फायनान्स आणि पर्यावरण या विषयांवर संशोधन करणारी संस्था आहे.[१] संस्थेची स्थापना १९८७ मध्ये झाली. संस्थेने १९९० पासून पी.एच.डी, १९९५ पासून एम.फील आणि २००३ पासून एम.एस.सी या पदव्यांसाठीच्या शिक्षणाची सुरुवात केली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे या संस्थेचे संचालक आहेत.[२]
संस्थेत शिकविले जाणारे अभ्यासक्रम
१. अर्थशास्त्रात एम.एस.सी[३]
संस्थेत शिकविला जाणारा अर्थशास्त्रात एम.एस.सी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. अर्थशास्त्राशी संबंधित १६ विषयांचे कोर्सेस किंवा १५ कोर्सेस आणि एम.एस.सी प्रबंध पूर्ण केल्यास ही पदवी विद्यार्थ्यांना मिळते. या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश गणित, इंग्रजी आणि बुद्धीमापन चाचण्या या विषयांतील लिखित परिक्षा आणि मुलाखती याद्वारे दिले जातात.
अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना सूक्ष्मअर्थशास्त्रावरील (मायक्रोइकॉनॉमिक्स) दोन, दीर्घअर्थशास्त्रावरील (मॅक्रोइकॉनॉमिक्स) दोन, संख्याशास्त्रावरील दोन, गणितावरील एक तर विकासाच्या अर्थशास्त्रावरील एक असे एकूण ८ विषय अभ्यासाला असतात.पहिल्या वर्षातील सर्व विषय सर्व विद्यार्थ्यांना समान असतात.तर दुसऱ्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था, उर्जेचे अर्थकारण आणि सार्वजनिक अर्थकारण हे ३ समान विषय आणि एकूण २० पैकी ५ ऐच्छिक विषय असे एकूण ८ विषय अभ्यासाला असतात.
२. अर्थशास्त्रात एम.फील[४]
या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवायला विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रात आधीच एम.एस.सी पूर्ण करणे गरजेचे असते. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असतो.पहिल्या वर्षी एकूण ८ विषय अभ्यासाला असतात. यापैकी ४ विषय सर्व विद्यार्थ्यांना समान तर आणखी ४ ऐच्छिक विषय असतात. तसेच दुसऱ्या वर्षी एम.फीलसाठीचा प्रबंध विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागतो.
३. अर्थशास्त्रात पी.एच.डी[५]
या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवायला विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रात आधीच एम.एस.सी पूर्ण करणे गरजेचे असते. हा अभ्यासक्रम सामान्यत: चार वर्षाचा असतो.पी.एच.डीच्या विद्यार्थ्यांना एकूण १२ विषय अभ्यासाला असतात. यापैकी ४ विषय सर्व विद्यार्थ्यांना समान तर आणखी ८ ऐच्छिक विषय असतात. हे १२ विषय पहिल्या दीड वर्षात पूर्ण करायचे असतात तर उरलेल्या अडीच वर्षात पी.एच.डीसाठीचा प्रबंध विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.igidr.ac.in/
- ^ http://www.igidr.ac.in/index.php?option=com_content&view=article&id=22&Itemid=90
- ^ http://www.igidr.ac.in/index.php?option=com_content&view=article&id=12&Itemid=22
- ^ http://www.igidr.ac.in/index.php?option=com_content&view=article&id=15&Itemid=23
- ^ http://www.igidr.ac.in/index.php?option=com_content&view=article&id=16&Itemid=24