Jump to content

इंडिया हाऊस

इंडिया हाउस हे लंडन शहरातील विद्यार्थी वसतिगृह होते. शहराच्या हायगेट भागाच्या क्रॉमवेल रोडवरील हे वसतिगृह १९०५ ते १९१० दरम्यान वापरात होते. याची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय वकीलांनी केली होती. लंडन व इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी येथे जमत व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करीत तसेच चळवळी आखीत. इंडियन सोशियोलॉजिस्ट हे वसाहतवादविरोधी वृत्तपत्र येथून प्रकाशित होत असे.

स्वातंत्र्यवीर सावरकर, मादाम कामा, विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, लाला हर दयाल आणि मदन लाल ढिंगरा यांसह अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी याचा वापर केला होता. कर्झन वायलीच्या हत्येनंतर स्कॉटलंड यार्डने येथे करडी नजर ठेवून येथे जमणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवली होती. त्यानंतर याचा वापर कमी होत गेला.