Jump to content

इंडियन रॉक

इंडियन रॉक तथा इंडिरॉक हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले रॉक संगीत होय.

पाश्चात्त्य पॉप, लोकसंगीत आणि रॉक संगीत हे साठच्या सुमारास आकाशवाणी सिलोन न केंद्र, अमेरिकेतील बीबीसी या केंद्रावरून ऐकायला मिळत असे. या पद्धतीच्या संगीताचा भारतीय बॅंडपथकावर परिणाम दिसून येतो. कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, मुंबई... इत्यादी शहरांमध्ये इंडियन रॉकसाठी धातूच्या पात्रांचा वापर करतात. भारतामध्ये रॉक संगीत दिवसेन् दिवस अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. याशिवाय ‘रॉक आणि रोल’ फ्युजन हेही भारतीय संगीतामध्ये आले. अधूनमधून संगीतामध्ये विविध प्रकार येत असतात. गीतप्रकारामध्ये भारतातील प्रादेशिक भाषेतील गीतांच्याबरोबरच पाश्चिमात्य गीतांचेही अस्तित्व जाणवत आहे. पाश्चिमात्य संगीत प्रकारामध्ये कर्कश्श वाटणाच्या वाद्याचा काही वेळा उपयोग केला जातो. भारतीय संगीत आणि भारतीय विविध गीतप्रकार हे लोकप्रिय असून भारतीय संस्कृतीचा तो एक अमूल्य असा ठेवा आहे. आज कित्येक वर्षे हा ठेवा जतन करून ठेवलेला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा संगीतकलेचा पाया आहे. पाया मजबूत असल्यास कोणताही गीतप्रकार गायला किवा वाजवायला अवघड वाटणार नाही. सामान्य रसिक श्रोते शास्त्रीय संगीताचे ज्ञान न घेताही भारतीय गीतप्रकारांचा आणि संगीताचा आस्वाद मनापासून घेऊ शकतात.