Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२

इंग्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
नेदरलँड्स
इंग्लंड
तारीख१७ – २२ जून २०२२
संघनायकपीटर सीलार (१ला ए.दि.)
स्कॉट एडवर्ड्स (२रा,३रा ए.दि.)
आयॉन मॉर्गन (१ला,२रा ए.दि.)
जोस बटलर (३रा ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावास्कॉट एडवर्ड्स (२१४‌) जोस बटलर (२४८)
फिल सॉल्ट (२४८)
सर्वाधिक बळीपॉल व्हॅन मीकीरन (२)
पीटर सीलार (२)
आर्यन दत्त (२)
डेव्हिड विली (८)
मालिकावीरजोस बटलर (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने ॲम्स्टलवीन शहरातील व्ही.आर.ए. मैदान या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.

पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने ४९८ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडने २०१८ साली स्थापलेला वनडेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. तसेच लिस्ट-अ क्रिकेटमधील देखील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडने पहिला सामना २३२ धावांनी जिंकला. नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सीलार याने पाठीच्या दुखण्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने शेवटच्या दोन सामन्यांकरिता स्कॉट एडवर्ड्सला नेदरलँड्सचा कर्णधार नेमले गेले. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिकाविजय नोंदवला.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
१७ जून २०२२
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
४९८/४ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२६६ (४९.४ षटके)
जोस बटलर १६२* (७०)
पीटर सीलार २/८३ (९ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ७२* (५६)
मोईन अली ३/५७ (१० षटके)
इंग्लंड २३२ धावांनी विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंडने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, नेदरलँड्स - ०.

२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
१९ जून २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२३५/७ (४१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३९/४ (३६.१ षटके)
फिल सॉल्ट ७७ (५४)
आर्यन दत्त २/५५ (९ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: नितीन बाठी (ने) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
  • टिम प्रिंगल (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, नेदरलँड्स - ०.

३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२२ जून २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२४४ (४९.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४८/२ (३०.१ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ६४ (७२)
डेव्हिड विली ४/३६ (८.२ षटके)
जेसन रॉय १०१* (८६)
पॉल व्हॅन मीकीरन २/५९ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड पेन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, नेदरलँड्स - ०.