Jump to content

इंग्रजी


EN (ISO 639-1)

इंग्लंड देशात राहणाऱ्या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलियान्यू झीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. (अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत). कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणाऱ्या व समजल्या जाणाऱ्या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे

३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.

इंग्लिश ही पश्चिम-जर्मॅनिक भाषा आहे. ॲंग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतिकीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

स्वर-व्यंजने

IPADescriptionमराठी उच्चार (सर्वसाधारण)इंग्लिश शब्दइंग्लिश स्पेलिंगसाठी अक्षर/अक्षरे
en:monophthongs
i/i:en:Close front unrounded vowelmachineae (æ), e, ee, ea, ei, ie, i, ey, oe (œ).
ɪen:Near-close near-front unrounded vowelbiti, ie, y, ey, ui.
ɛen:Open-mid front unrounded vowelऱ्हस्व एrede, ea, a, ai, ay.
æen:Near-open front unrounded vowelcata
ɒen:Open back rounded vowelऱ्हस्व ऑhoto, ua, au, ou, ow
ɔ:en:Open-mid back rounded vowelदीर्घ ऑc'aughta, or, ore, ough, oor, aw, al, oar, ough, o, ar
ɑ/a:en:Open back unrounded vowelfathera, au, ah, al.
ʊen:Near-close near-back rounded vowelputu, o, ou, oo, ui
u/u:en:Close back rounded vowelruleu, oo, o, ou, ui, ew, eau, oe, wo
ʌ/ɐen:Open-mid back unrounded vowel, en:Near-open central vowelऱ्हस्व अcutu, o, ou, oo, oe
ɝ/ɜ:en:Open-mid central unrounded vowelदीर्घ अbirder, ir, ur, or, ear, our
əen:Schwaabovea, ar, e, er, o (unstressed)
ɨen:Close central unrounded vowelअतिऱ्हस्व इrosezes, i
en:diphthongs
en:Close-mid front unrounded vowel
en:Close front unrounded vowel
एऽ/*एइgatea, ay, ai, ey, ea
oʊ/əʊen:Close-mid back rounded vowel
en:Near-close near-back rounded vowel
homeo, ow, oa, ou
en:Open front unrounded vowel
en:Near-close near-front rounded vowel
ऐ/आइtimei, y, igh, ei, uy
en:Open front unrounded vowel
en:Near-close near-back rounded vowel
औ/आउhouseou, ow
ɔɪen:Open-mid back rounded vowel
en:Close front unrounded vowel
*ऑइspoiloi, oy

व्यंजने

bilabial ओष्ठ्यLabiodental दन्त्योष्ठ्यdental दन्त्यalveolar वर्त्स्यpost-
alveolar परा-वर्त्स
palatal तालव्यvelar कण्ठ्यglottal काकल्य
plosive स्पर्शp प b बt *त--ट d द--डk क g ग
nasal अनुनासिकm मn नŋ ङ
flap उत्क्षिप्‍तɾ र
fricative संघर्षीf फ़ v व्हθ थ ð दs स z ज़ʃ श ʒ झh ह
affricate स्पर्श-संघर्षीtʃ च dʒ ज
en:approximant अर्धस्वरw *वɹ रj य
lateral approximant पार्श्विकl ल, ɫ ल

इथे *चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्लिश भाषेत वापरला जात नाही.

ध्वनि-अक्षर संबंध

IPAइंग्लिश अक्षर |इतर भाषात
pp
bb
tt, th (rarely) thyme, Thamesth thing ( African-American, New York)
ddth that ( African-American, New York)
kc (+ a, o, u, consonants), k, ck, ch, qu (rarely) conquer, kh (in foreign words)
gg, gh, gu (+ a, e, i), gue (final position)
mm
nn
ŋn (before g or k), ng
ff, ph, gh (final, infrequent) laugh, roughth thing (many forms of English used in England)
vvth with ( en:Cockney, en:Estuary English)
θth : there is no obvious way to identify which is which from the spelling.
ð
ss, c (+ e, i, y), sc (+ e, i, y)
zz, s (finally or occasionally medially),

बाह्य दुवे