Jump to content

आसाम रायफल

Fusileros de Assam (es); আসাম রাইফেলস (bn); Fusiliers de l'Assam (fr); असम रायफल्स (mr); 阿薩姆步槍隊 (zh); アッサム・ライフル部隊 (ja); Assamfältjägarna (sv); Ассамські стрільці (uk); ആസ്സാം റൈഫിൾസ് (ml); 阿薩姆步槍隊 (zh-hant); असम राइफल्स (hi); ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್ (kn); 阿萨姆步枪队 (zh-cn); Assam Rifles (en); Assam Rifles (id); 阿萨姆步枪队 (zh-hans); அசாம் ரைப்பிள்ஸ் (ta) Indian paramilitary (en); आसाम रायफल्स (mr) Fusiliers de l'assam, Fusiliers De L'Assam (fr); 阿萨姆步枪队 (zh)
असम रायफल्स 
आसाम रायफल्स
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारparamilitary organization
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १८३५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आसाम रायफल्स हे भारतातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे.[] या दलाची रचना १८३५मध्ये कचर लेव्ही नावाने झाली. त्यानंतर त्याचे नाव अनेकदा बदलले. आसाम फ्रंटियर पोलिस (१८८३), आसाम मिलिटरी पोलिस (१८९१) आणि ईस्टर्न बेंगाॅल ॲन्ड आसाम मिलिटरी पोलिस (१९१३) या नावांनी ओळखले जाणाऱ्या या दलास १९१३ साली आसाम रायफल्स हे नाव देण्यात आले. या दलाने अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धात हे दल युरोप आणि मध्यपूर्वेत तैनात झाले तर दुसऱ्या महायुद्धात म्यानमारमध्ये जपानी सैन्याविरुद्ध लढले.

या दलात ४६ बटालियन असून त्यांत एकूण ६६,४११ सैनिक आहेत.[][] हे दल भारताच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. अलीकडे या दलाने दहशतवादविरोधी कारवाया तसेच सीमा सुरक्षा कार्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत करण्यात भाग घेतला आहे. याशिवाय आसाम रायफल्स दुर्गम भागात दळणवळणाची, वैद्यकीय व शैक्षणिक मदत करते. युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो. २००२ सालापासून आसाम रायफल्स म्यानमार सीमेवर तैनात आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Central Armed Police Forces". 2016-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-09 रोजी पाहिले.
  2. ^ History of the Assam Rifles
  3. ^ "MHA Annual Report 2016-16" (PDF). 2017-06-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-12-09 रोजी पाहिले.
  4. ^ "One Border One Force?". http://www.outlookindia.com/. External link in |कृती= (सहाय्य)