आशिष उबाळे
आशिष उबाळे हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आहेत. एक तरुणी आणि तिचा भाडोत्री नृत्य-जोडीदार यांची कहाणी असलेला ‘गार्गी’ नावाचा त्यांचा चित्रपट २००९ साली नागपूर येथे भरलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. तिथे तो वाखाणला गेला. या चित्रपटाचे संवाद लेखन श्याम पेठकर यांचे होते.
आशिष उबाळे यांची निर्मिती असलेले चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका
- अग्नी (दूरचित्रवाणी मालिका)
- एका श्वासावे अंतर (दूरचित्रवाणी मालिका)
- किमयागार (दूरचित्रवाणी मालिका)
- गजरा (दूरचित्रवाणी मालिका)
- गार्गी (चित्रपट)
- चक्रव्यूह (दूरचित्रवाणी मालिका)
- प्रेमासाठी वाट्टेल ते (चित्रपट)
- बाबुरावला पकडा (चित्रपट) (दिग्दर्शन)
संदर्भ
- सिनेमा अश्लील नाही : या संदर्भ पानावर दिलेली माहिती पडताळून पाहता आलेली नाही!