आशा सचदेव
भारतीय अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
नफीसा सुलतान, ह्या त्यांच्या पडद्यावरील आशा सचदेव या नावाने ओळखल्या जातात ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या १९७० आणि १९८० च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून भूमिकांसाठी ओळखल्या जात.[१][२] त्यांनी काही सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले, ज्यात हिट हेरगीरीचा चित्रपट एजंट विनोद (१९७७) आणि थ्रिलर चित्रपट वो मैं नहीं (१९७४) यांचा समावेश आहे.[३] १९७८ मध्ये प्रियतमा चित्रपटातील भूमीकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिफाजत (१९७३) आणि एक ही रास्ता (१९७७) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिकेत होत्या. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले आणि राजेश रोशन यांनी संगीत दिलेले एक ही रास्ता या चित्रपटातील त्यांच्यावर आणि जितेंद्र यांच्यावर चित्रित केलेले "जिस काम को दोनो आये है" हे गाणे आणि मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले द बर्निंग ट्रेनमधील "पल दो पल का" या लोकप्रिय कव्वाली गाण्यासोबतच त्या लोकप्रिय झाल्या.
आशा ही अभिनेत्री रंजना सचदेव आणि संगीतकार अहमद अली खान (आशिक हुसैन) यांची मुलगी. तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर, तिच्या सावत्र वडिलांच्या नावावरून तिने रंगमंचाचे नाव धारण केले. गायक अन्वर हुसैन हा तिचा भाऊ आहे आणि तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे ती अभिनेता अर्शद वारसीची सावत्र बहीण आहे.
कारकीर्द
आशा फिल्म अँड दूरचित्रवाणी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणेच्या माजी विद्यार्थिनी होत्या आणि बॉलीवूडमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ मध्ये डबल क्रॉस या कमी-बजेट चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्यांनी एक ठळक आणि गतिमान भूमिका साकारली, तथापि हा चित्रपट फ्लॉप ठरला. हिफाजत (१९७३) मध्ये त्यांना मुख्य भूमिका मिळाली आणि तिच्या चांगल्या अभिनयासाठी आणि विशेषतः "ये मस्तानी डगर" आणि "हमराही मेरा प्यार" या गाण्यांसाठी या चित्रपटाचे कौतुक झाले. पण त्यानंतर त्यांना फक्त सहाय्यक आणि बोल्ड भूमीका देण्यात आल्या. नविन निश्चोल व रेखा अभिनीत थ्रिलर वो मैं नहीं (१९७४), मध्ये त्यांचा आयटम डान्स प्रसिद्ध झाला व त्यांना असेच पात्र मिळत गेले.
त्यांना अधूनमधून प्रमुख भूमिका मिळाल्या - जसे की एजंट विनोद आणि एक ही रास्ता (१९७७), जे हिट ठरले. १९७८ मध्ये प्रियतमा मधील नीतू सिंगच्या मैत्रीणीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भूमिकेत, त्यांनी चश्मा घालून एक साधी साडी नेसली होती. मामा भांजा, लफंगे, मेहबूबा, सत्ता पे सत्ता, दुनिया मेरी जब में, द बर्निंग ट्रेन, जुदाई, प्रेम रोग आणि ईश्वर हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्या दूरचित्रवाणीकडे वळाल्या आणि ९० च्या दशकातही मालिकांमध्ये काम करत होती. १९९५ मध्ये त्यांनी ओरु अभिभाषकांते केस डायरी या मल्याळम चित्रपटात देखील काम केले.
त्यांनी २००० च्या दशकात चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आणि फिजा, आघाज, झूम बराबर झूम आणि आजा नचले यांसारख्या चित्रपटांमध्ये पात्र भूमिका साकारताना दिसल्या. दूरचित्रवाणीमध्ये, त्यांनी बुनियाद (१९८६) मध्ये काम केले आणि २००८ मध्ये, त्या अभिनेता रणजीत सोबत सब टीव्हीवरील जुगनी चली जालंधर या टीव्ही मालिकेतही दिसल्या. [४]
वैयक्तिक जीवन
आशा यांचे लग्न किसन लाल सोबत ठरले होते जे व्यवसायाने वकील होते. पण लग्नाआधिच एका अपघातात किसन लालयांचा मृत्यू झाला व त्या- नंतर आशा यांनी लग्न केले नाही.[५]
फिल्मोग्राफी
चित्रपट
वर्ष | चित्रपट | भूमिका |
---|---|---|
१९७२ | बिंदिया और बंदुक | |
डबल क्रॉस | लिली | |
१९७३ | हिफाजत | आशा |
कष्मकश | रितू | |
१९७४ | परिणय | |
१९७५ | लफंगे | लीना |
१९७६ | मेहबुबा | रिटा मल्होत्रा |
१९७७ | मामा भांजा | |
एजंट विनोद | अंजू सक्सेना | |
प्रियतमा | रेणू | |
१९७८ | खून का बदला खून | |
१९८० | द बर्निंग ट्रेन | रामकली |
१९८१ | ज्वाला डाकू | बिजली |
नाखुदा | गणिका | |
१९८२ | सत्ता पे सत्ता | गुरुची मैत्रीण |
सुराग | रेणू लांबा | |
१९८४ | एक नई पहेली | जीत कुमारी |
१९८५ | 3D सामरी | मारिया |
१९८८ | पडोसी की बीवी | |
आखरी मुकाबला | ||
१९८९ | ईश्वर | गावातील धुलाई |
१९९० | बागी | लीलाबाई |
अग्निपथ | चंदाबाई | |
१९९३ | चंद्र मुखी | कामिनी राय |
१९९५ | कार्तव्य | रूप सुंदरी (उग्रनारायणाची पत्नी) |
ओरु अभिभाषकांते केस डायरी | ||
२००० | फिजा | उल्फत |
२००६ | राफ्ता राफ्ता |
दूरदर्शन
वर्ष | मालिका | भूमिका | चॅनल |
---|---|---|---|
१९८६-८७ | बुनियाद | शन्नो | डीडी नॅशनल |
२००० | इना मीना डीका | डीडी मेट्रो |
संदर्भ
- ^ Jha, Subhash K.; Bachchan, Amitabh (1 November 2005). The essential guide to Bollywood. Roli Books Private Limited. pp. 1999–. ISBN 978-81-7436-378-7. 31 May 2011 रोजी पाहिले.
- ^ "Shake a leg with the golden era queens". DNA. 21 June 2010. 23 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Shriman Bond". Mint. 19 January 2008. 23 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Ranjeet's little secret is out". The Times of India. 23 December 2008. 3 November 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Who Was Asha Sachdev? Some Lesser-known Facts About Former Bollywood Actress". २ ऑगस्ट २०२३.