आशा आपराद
प्रा.डाॅ. आशा दस्तगीर आपराद ( - २३ ऑगस्ट २०१९) या कोल्हापूृर येथे राहणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. त्या हिंदी भाषेच्या प्राध्यापिका होत्या. मुस्लिम समाज आणि मुस्लिम महिला यांच्या प्रश्नांवर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. कोल्हापूर विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी काम केले. शेवटच्या काळात महिला दक्षता समितीवर त्या काम करत होत्या.
आशा आपराद यांचे 'भोगले जे दुःख त्याला...' हे आत्मचरित्र विशेष गाजले. 'दर्द जो सहा मैंने...' या नावाने या आत्मकथनाचे हिंदी भाषांतर झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी काम केले. सध्या महिला दक्षता समितीवर त्या काम करत होत्या.
अभिनेत्री आशा शेलार यांनी एका कार्यक्रमात आपल्या अभिनयातून आशा आपराद यांना सादर केले होते. अभिनय आणि संवाद यांच्या साहाय्याने एका मुस्लिम स्त्रीची शिक्षणासाठीची धडपड व त्याला समाजाबरोबरच घरातून होणारा तीव्र विरोध, ही कथा आशा शेलार यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
आशा आपराद यांना मिळालेले पुरस्कार
- भैरुरतन दमाणी पुरस्कार
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट मराठी वाङ्मय राज्य पुरस्कार
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचा पुरस्कार