आशालता वाबगांवकर
आशालता वाबगांवकर | |
---|---|
जन्म | आशालता वाबगांवकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | जावई विकत घेणे आहे |
आशालता वाबगांवकर (०२ जुलै १९४१ मुंबई[१], २२ सप्टेंबर २०२० सातारा) [२] ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री होत्या. कोरोना १९ या विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले.[३]
बालपण व शिक्षण
आशालता यांचा जन्म मुंबई येथे ३१ मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगांवकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. होत्या.
नाट्य सृष्टीतील कारकीर्द
‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. गोपीनाथ सावकारांनी आशालता यांची रेवती या भूमिकेसाठी निवड केली.संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.[४]
हिंदी आणि मराठी चित्रपट
त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट बासू चटर्जी यांचा 'अपने पराये'(हिंदी) हा आहे. या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले.याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्या सर्व परिचित झाल्या त्यांच्या अनेक भूमिका विशेषत्वाने लोकांना आवडल्या एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द ही महत्त्वपूर्ण राहिली अशा या कलावंताचा दुर्दैवी अंत होणे हा लोकांना चटका लावणारी गोष्ट ठरली मराठी चित्रपटसृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
मालिका
छोट्या पडद्यावरील दूरदर्शन मालिकांमध्ये आशालता यांनी भूमिका केल्या आहेत.
भूमिका असलेली नाटके
- आश्चर्य नंबर १० (१९७१)
- गरुड झेप (१९७३)
- गुड बाय डॉक्टर (१९७६)
- गुंतता हृदय हे (१९७४)
- गोष्ट जन्मांतरीची (१९७८)
- छिन्न (१९७९)
- देखणी बायको दुसऱ्याची (१९९२)
- मत्स्यगंधा (१९६४)
- रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२)
- विदूषक (१९७३)
चित्रपट
- आत्मविश्वास (१९८९)
- तिन्ही सांजा(२००९)
- पकडापकडी (२०११)
- मणी मंगळसूत्र (२०१०)
- लेक लाडकी (२०१०)
- वन रूम किचन (२०११)
त्यांनी गायलेली नाट्यगीते (कंसात नाटकाचे नाव)
- अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा)
- गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा)
- जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा)
- तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा)
- स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)
लिहीलेली पुस्तके
- संगीत या विषयावर आधारित 'गर्द सभोवती' हे पुस्तक
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आशालता वाबगावकर: चतुरस्र, संवेनशील अभिनेत्री". Maharashtra Times. 2020-09-27 रोजी पाहिले.
- ^ "ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे करोनामुळे निधन". Loksatta. 2020-09-22. 2020-09-22 रोजी पाहिले.
- ^ "Marathi actress Ashalata Wabgaonkar passes away at 79 after contracting Covid on sets of TV serial". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-09-22. 2020-09-27 रोजी पाहिले.
- ^ "ashalata wabgaonkar: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन". Maharashtra Times. 2020-09-27 रोजी पाहिले.