आव्हियों पोपशाही
आव्हियों पोपशाही ही मध्य युगीन फ्रान्समधील आव्हियों ह्या शहरात इ.स. १३०९ ते इ.स. १३७८ सालांदरम्यान पदारूढ झालेल्या सात पोपांची परंपरा उल्लेखणारी संज्ञा आहे.
खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते.
- पोप क्लेमेंट पाचवा: १३०५ - १३१४
- पोप जॉन बावीसावा: १३१६ - १३३४
- पोप बेनेडिक्ट बारावा: १३३४ - १३४२
- पोप क्लेमेंट सहावा: १३४२ - १३५२
- पोप इनोसंट सहावा: १३५२ - १३६२
- पोप अर्बन पाचवा: १३६२ - १३७०
- पोप ग्रेगरी अकरावा: १३७० - १३७८
अकरावा ग्रेगरी निघन पावल्यानंतर पुढील पोप अर्बन सहावा ह्याने रोम येथेच राहणे पसंद केले व पोपची गादी पुन्हा एकदा रोममध्ये आली.