आवानओल प्रतिष्ठान
आवानओल प्रतिष्ठान ही एक कणकवलीमधली साहित्यसंस्था आहे. कोकणात भातपेरणीच्यावेळी भरपूर पाऊस आवश्यक असतो. त्यात रोपे लावली जातात. मग ती उचलून दुसरीकडे पेरणी केली जाते. जर पुरेसा पाऊस आला नाही तर ही रोपे जमेल तेवढ्या पाण्यात कसेही करून जगवली जातात. अशी अपुऱ्या पाण्यावरची रोपे जगवण्याला ‘आवान’ असा शब्द आहे. कवी अजय कांडर याने यापासून 'आवानओल' असा शब्द तयार केला. आणि तेच नाव त्याच्या काव्यसंग्रहाला आणि संस्थेला दिले.
अावानओल प्रतिष्ठान हे निवडक काव्यसंग्रहांना 'आवानओल पुरस्कार' देते. हा पुरस्कार एखाद्या कवीच्या हस्तेच दिला जातो.
अावानओल पुरस्कार मिळालेले कवितासंग्रह आणि त्यांचे कवी
- एरवी हा जाळ (कवी अभय दाणी) {कवी वसंत सावंत पुरस्कार, फेब्रुवारी २०१४)
- अप्रकाशित काव्यसंग्रह (कवी बालाजी सुतार) (कवी द. भ. धामणस्कर पुरस्कार, डिसेबर २०१४)
- आगाजा (कवी विनोद कुमरे ) (कवी वसंत सावंत पुरस्कार, सप्टेंबर २०१६). (टीप - आगाजा म्हणजे आवाहन)
- अप्रकाशित काव्यसंग्रह (वसईतील कवी फेलिक्स डिसोजा) (कविवर्य द.भा.धामणस्कर काव्य पुरस्कार नोव्हेंबर २०१६)
- शहर आत्महत्या करायचं म्हणतंय (ठाण्याचे कवी सुशिलकुमार शिंदे) (वसंत सावंत ८वा काव्यपुरस्कार, जानेवारी २०१८)
- अप्रकाशित काव्यसंग्रह (कवी संदीप जगदाळे) (कवी द. भ. धामणस्कर पुरस्कार, जानेवारी २०१८)
- प्रलयानंतरची तळटीप (कवयित्री [[सुचिता खल्लाळ) (वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार, डिसेबर २०१८).