आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका
आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका (इ.स. १४८८/१४९०/१४९२[१]:हेरेझ दिला फ्रोंतेरा, स्पेन - इ.स. १५५७/१५५८/१५५९[१]/१५६०[२]):सेव्हिया, स्पेन) हा एक स्पॅनिश शोधक होता. १५२७ च्या नार्वाएझ शोधमोहीमेतून बचावलेल्या चौघांपैकी हा एक होता. याने आठ वर्षे अमेरिकेच्या आग्नेय भागात भटकंती करीत असताना तेथील स्थानिक लोकांशी व्यापार केला व त्यांचे रोग बरे करण्याचा प्रयत्न केला.
हा सध्याच्या टेक्सास राज्यात प्रवेश करणारा पहिला युरोपीय होता.
इ.स. १५४०मध्ये काबेझा दि व्हाकाला सध्याच्या आर्जेन्टिना भागाचा शासक (अदेलांतादो) नेमण्यात आले.[३] बॉयनोस आयरेसचा कॅप्टन जनरल असताना याने त्या शहराचा विकास होण्यास हातभार लावला.
काबेझा दि व्हाकावर अनेक आरोप होउन इ.स. १५४५मध्ये त्याला स्पेनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्यावरी आरोप सिद्ध होउन त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर त्याला माफी देउन सोडण्यात आले परंतु हा परत अमेरिकेस कधीच आला नाही व १५६० च्या सुमारास सेव्हियामध्ये मृत्यू पावला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "Cabeza de Vaca, Alvar Núñez (1492?-1559?)." American Eras. Vol. 1: Early American Civilizations and Exploration to 1600. Detroit: Gale, 1997. 50-51. Gale Virtual Reference Library. Web. 10 Dec. 2014.
- ^ "Alvar Nunez Cabeza de Vaca". Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica Online. Encyclopædia Britannica Inc., 2014. Web. 08 Dec. 2014.
- ^ "Álvar Núñez Cabeza de Vaca," Encyclopedia of World Biography. 2nd ed. Vol. 3. Detroit: Gale, 2004. 197. Gale Virtual Reference Library. Web. 5 Dec. 2014.